Home »Gossip» Sonam Kapoor And Anand Ahuja Are All Set To Tie The Knot In 2018

सोनम कपूरची सुरु झाली 'लगीनघाई', ज्वेलरी शॉपिंगनंतर आता हनीमूनचेही अशी आहे प्लानिंग

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 15:30 PM IST

मुंबई - सोनम कपूर नुकतीच कोलकात्याच्या पॉप्युलर ज्वेलरी स्टोरमध्ये वेडींग ज्वेलरी खरेदी करताना दिसली. यावेळी सोनमसोबत तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा नव्हे तर आई होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम कोलकाताच्या राज महतानी ज्वेलरी स्टोरमध्ये स्पॉट झाली. हे स्टोर ब्रायडलसाठी वन स्टॉप डेस्टीनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. येथे आऊटफइट्सपासून मॅचिंग ज्वेलरी तसेच मनिष मल्होत्रा आणि अनामिका खन्नाचे क्रिएशंसही उपलब्ध आहेत. यावर्षी अडकणार विवाहबंधनात...

मिळालेल्या माहितीनुसार, सोनम आणि आनंद यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करु शकतात. दोघांनाही अनेक इवेंटमध्ये सोबतच पाहिले गेले तेव्हापासून त्यांच्या अफेअरविषयी चर्चा होत आहे. दोघेही नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी पॅरीसला गेले होते. यावेळी काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.

असे म्हटले जाते की, सोनमचे हे लग्न राजस्थान येथील जोधपूर येथे होणार आहे. हे एक रॉयल वेडींग असणार आहे यात शंकाच नाही. सोनमची बहीण रिया कपूर सोनमसाठी एक मोठे हनीमून सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. पण अजून हे हनीमून सरप्राईज काय असणार हे अजून समोर आलेले नाही.

पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनम-आनंदचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended