आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरने चित्रपटांसाठी कमी केले 30 किलो वजन, Fat To Fit झाले हे सेलिब्रेटीज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सोनम कपूर आज तिचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनमने सावरिया या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 'साँवरिया' चित्रपटात अगदी चवळीच्या शेंगेसारखी दिसणारी सोनम चित्रपटात येण्याअगोदर 86 किलोची होती. सिनेमांसाठी तिने जवळपास ३० किलो वजन कमी केले होते. 
  
86 किलोवरुन 51 किलोवर येण्यासाठी सोनमने शेरवीर आणि मोनीषापासून वेट लॉस ट्रेनिंग घेतली. यास्मीन कराचीवाला आणि फिटनेस ट्रेनर जरीन वॉटसनचे काही सेशन्स केले. याशिवाय तिने  योगा आणि कथ्थकद्वारेही तिचे शरीर फिट ठेवले. दिवस भर अनेक प्रकारचे व्यायाम करत सोनमने तिचे वजन कमी केले.

 

असा असायचा सोनमचा वर्कआऊट प्लान..
सोनमचा दिवस जॉगिंगने सुरु होते आणि त्यानंतर ती 30 मिनिटे कार्डिओ एक्सरसाईज करते. आठवड्यातून 4 वेळा ती योगा करते तसेच तिला स्विमींग करणेही फार आवडते. यामुळे ती उन्हाळ्यात स्विमींग करते. सोनमला स्क्वॅश खेळणेही फार आवडते. स्क्वॅश खेळल्याने तिला स्ट्रेंथ मिळते असे ती सांगते. 

 

असे आहे सोनमचे डाएट प्लान.. 

सकाळी- 1 ग्लास गरम नींबू पाणी आणि मध  
ब्रेकफास्ट -  ओटमील आणि हंगामी फळे 
मिड-मॉर्निंग स्नॅक - नारळपाणी आणि ताज्या फळांचा ज्यूस 
दुपारचे जेवण -बाजरी-ज्वारीची भाकरी + दाळ + मासे/चिकन + भाज्या + सॅलड
संध्याकाळचे स्नॅक्स : अंड्याचा पांढरा भाग अथवा चिकन + मल्टीग्रेन क्रॅकर्स
डिनर - सूप + सॅलड + चिकन/मासे

 

केवळ सोनमच नव्हे तर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चित्रपटांत येण्यापूर्वी त्यांचे वजन कमी केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच काही सेलिब्रेटींविषयी..

बातम्या आणखी आहेत...