आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • सोनम कपूरचे लग्न, अनिल कपूर, Sonam Kapoor House Is All Set For Wedding Celebs Arrive For Preparation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच्या लग्नासाठी सजला अनिल कपूरचा बंगला, पत्नीची आहे सर्व तयारीवर बारीक नजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री सोनम कपूर येत्या 8 मे रोजी दिल्लीतील बिझनेसमन आनंद आहुजासोबत विवाहबद्ध होणार आहे. मुलगी सोनमच्या लग्नासाठी वडील अनिल कपूर यांनी मुंबईतील त्यांचा बंगला नववधूसारखा सजवला आहे. सोशल मीडियावर एक व्हि़डिओ समोर आला असून, यामध्ये सोनमची आई सुनीता कपूर सर्व तयारीवर लक्ष देत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी बॉलिवूडचे काही सेलेब्स अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले होते. यामध्ये करण जोहर, मोहित मारवाह, मसाबा गुप्ता, फराह खान, अंशुला कपूर यांचा समावेश होता. 


दोन दिवस चालणार लग्नाचे फंक्शन... 

- रिपोर्ट्सनुसार, सोनमच्या लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस चालतील. 7 मे रोजी संगीत आणि हळदी सेरेमनी होईल. तर 8 मे रोजी लग्न होईल.
- सोनम-आनंदचे लग्न सुनीता कपूर यांची बहीण कविता सिंह यांच्या वांद्रास्थित हेरिटेज हवेलीत होणार आहे.
- रिपोर्ट्सनुसार, संगीत सेरेमनी सोनमची बेस्ट फ्रेंड संयुक्ता नायरच्या द लीला या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. कोरिओग्राफर फराह खान सोनमच्या संगीत फंक्शनची कोरिओग्राफी करणार आहे. संगीत सेरेमनीत अनिल कपूर, सुनीता कपूर, करण जोहर, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, जान्हवी कपूर स्पेशल डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. 

 

'मेरे हाथों में नौ नौ चूड़ियां हैं..'वर परफॉर्म करणार जान्हवी...
श्रीदेवीची मुलगी जान्हवी बहिणीच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीमध्ये फरफॉर्म करणार आहे. जान्हवी तिची आई श्रीदेवी यांच्या 'चांदनी' चित्रपटातील गाजलेल्या 'मेरे हाथो में नौ-नौ चूडिया है...' या गाण्यावर डान्स करणार आहे. जान्हवी सध्या डान्सची प्रॅक्टिस करण्यात व्यस्त आहे. जान्हवी फक्त 'चांदनी' च्या गाण्यावरच  नव्हे तर श्रीदेवींच्या 'चालबाज' चित्रपटातील 'किसी के हाथ ना आएगी ये लडकी...' यावरही परफॉर्म करणार आहे. सोनम कपूरच्या जुहू येथील बंगल्यात सध्या संगीत सेरेमनीची तयारी सुरु आहे. सोनमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'मी माझ्या लग्नापेक्षा वेडिंग प्लानिंगसाठी एक्सायडेट आहे. लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यावर माझा आक्षेप आहे. त्यापेक्षा लग्नविधींना अधिक महत्त्व दिले गेले पाहिले. सोनम लग्नाचे कार्ड छापणार नाही असे वृत्त आहे. कार्ड न छापण्याचा निर्णय सोनम कपूरने घेतला आहे. सूत्रांनुसार सोनम आणि आनंदला कागद वेस्ट करायचे नाहीत. यामुळे त्यांनी वेडिंग कार्ड न छापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांनी ई-इनवाइट तयार केले आहेत. हे सर्वांना पाठवले जातील.'


पुढील स्लाईड्सवर बघा, सोनमच्या लग्नाच्या निमित्ताने तिच्या घरी पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...