आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonam Kapoor On Her Wedding सोनम कपूर, सोनम कपूरचे लग्न, आनंद आहुजा,

सोनम म्हणाली, 'लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणे आवडत नाही, घरीच होईल लग्न'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. तिचे लग्न बँडस्टँडच्या रॉकडेल बंगल्यात होईल, अशीही चर्चा आहे. तसेच तेथे लग्नाची लगबग सुरू आहे असून तारीखदेखील ठरली आहे, असेही बोलले जात आहे. मात्र, अजून याविषयी कपूर कुटुंबाकडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही. मात्र, सोनमने दुबईच्या एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने लग्नाविषयी मनमोकळी चर्चा केली.


साध्या पद्धतीने होणार लग्न... 
लग्न खूपच साध्या पद्धतीने होईल. त्यात फक्त निवडक मित्र आणि नातेवाईकच सहभागी होतील. विशेष म्हणजे, सोनमच्या लग्नाचे संगीत फराह खान कोरिओेग्राफ करत आहे. या लग्न समारंभात करण जोहर आणि अर्जुन कपूर परफॉर्म करणार आहेत. 


लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणे आवडत नाही... 
लग्नात आवाक्याबाहेर पैसा खर्च करणे मला मुळीच आवडत नाही. कुठे बाहेर लग्न करण्याचा मी विचारही करत नाही. लग्न घरीच पूर्ण विधीनुसार व्हायला हवे, असे मी मानते. मला देखावा करणे आवडत नाही. लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करायला नको, असे मला वाटते.' 

 

पुढे वाचा, कोण आहे सोनम कपूरचा भावी पती, जाणून घ्या त्याच्याविषयी..

बातम्या आणखी आहेत...