आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरने केले उघड, तिने नावासमोर का लावले नव-याचे आडनाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 8 मे रोजी सोनम कपूरने दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले. यानंतर लगेचच तिने सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नावासमोर नव-याचे आडनाव लावले. यानंतर सोनमचे फॅन्स वाद करत होते. काही म्हणत होते की, नाव बदलने हा तिचा वयक्तिक निर्णय आहे. तर काही यूजर्स तिच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहे आणि तिला ट्रोल करत आहेत. 32 वर्षांची सोनम फेमिनिस्टच्या रुपात ओळखली जाते. परंतू तिच्या काही फॅन्सला वाटते की, पतीचे आडनाव नावासमोर लावणे फेमिनिज्मच्या विरुध्द मानले जाते. तिच्या काही फॅन्सला वाटते की, पतीचे आडनाव नावासमोर लावणे फेमिनिज्मच्या विरुध्द आहे. काही यूजर्सने प्रश्न उपस्थित केलाय की, तुझ्या पतीनेही सरनेम (कपूर) लावले आहे का?

 

सोनमने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर
कान फिल्म फेस्टिव्हलच्या काळात एका मुलाखतीत सोनम या मुद्द्याविषयी बोलली. तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. सोनम म्हणाली, "मी दिर्घकाळापासून एंगेज्ड होते. मला हा निर्णय घेण्यासाठी खुप काळ लागला. आनंदचे सरनेम माझ्या नावासमोर लावणे हा माझा वयक्तिक निर्णय आहे. जर लोकांना फेमिनिज्मची कॉन्सेप्ट माहिती नाही तर त्यांनी ऑनलाइन जाऊन डिस्क्रिप्शन पाहायला हवे. आणि तुम्हाला कसे माहिती की, आनंदने आपले नाव बदलले की नाही?" 

 

बातम्या आणखी आहेत...