आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सोनम कपूर, कान फिल्म फेस्टिव्हल Sonam Kapoor Second Red Carpet Appearance At Cannes

लहेंग्यानंतर ऑफ शोल्डर गाऊनमध्ये Cannesच्या रेड कार्पेटवर अवतरली सोनम कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कान : अभिनेत्री सोनम कपूरचा कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील सेकंड अपिअरन्सदेखील अतिशय इम्प्रेसिव ठरला. मंगळवारी सोनम ऑफ शोल्डर असलेल्या न्यूड कलरच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली होती. सोनमचा हा ड्रेस अमेरिकन डिझायनर वेरा वांग गँगनी डिझाइन केला होता. न्यूड कलरच्या या गाऊनमध्ये येलो स्ट्रीप्सही दिसले. सोनमने तिचा हा लूक रिंग्स आणि इयरिंग्सनी पूर्ण केला. सोबत तिने हेअरबन केले होते. डोळे तिने गोल्डन मेकअपने हायलाइन केले होते.  सोनमचा कानच्या रेड कार्पेटवरील हा आतापर्यंतचा  8 वा अपिअरन्स होता. दरवर्षी ती तिच्या लूक्सने फॅशन वर्ल्डमध्ये चर्चा एकवटत असते. सोनम कानमध्ये लॉरिअल पेरिस या कॉस्मेटिक ब्रॅण्डसाठी भारताचे प्रतिनिधित्व करत असते.

 

8 मे रोजी सोनम अडकली लग्नाच्या बेडीत...
- सोनम कपूर याचवर्षी 8 मे रोजी दिल्ली बेस्ड  व्यावसायिक आनंद आहुजासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नाचे सर्व फंक्शन्स मुंबईत पार पडले. लग्नानंतर सोनम लगेच कानमध्ये सहभागी झाली. कानच्या रेड कार्पेटवर तिच्या हातावर मेंदी दिसली.
- सोनमच्या आगामी चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, यावर्षी तिचे दोन चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत.
- 1 जून रोजी तिचा 'वीरे दी वेडिंग' आणि 29 जून रोजी 'संजू'  हे दोन चित्रपट सोनमचे रिलीज होणार आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, सोनम कपूरचे फोटोज....  

बातम्या आणखी आहेत...