आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमच्या लग्नासाठी शॉपिंगवर निघाली जान्हवी-खुशी, बहिण अंशुला दिसली सोबत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूरच्या लग्नाचा फक्त 2 दिवस बाकी आहेत. अशा वेळी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरु आहे. फायनल संगीत रिहर्सलसाठी अर्जुन कपूर, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडीज पहिलेच सोनमच्या घरी पोहोचले आहेत. तर सोनच्या बहिणी अंशुला, जान्हवी आणि खुशी शनिवारी शॉपिंग करण्यासाठी मनीष मल्होत्राच्या स्टोरवर पोहोचल्या. तिघी बहिणींनी लग्नासाठी शॉपिंग केली. 


मनीष मल्होत्राने फायनल केला जान्हवी-खुशीचा ड्रेस
- बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नात मनीष मल्होत्राच्या डिझायनर आउटफिट घालणे पसंत करतात. मनीषने जान्हवी आणि खुशीचा ड्रेस डिझाइन केला आहे. मनीष मल्होत्रा हा जान्हवीची आई श्रीदेवीच्या खुप जवळचा होता. अशा वेळी त्या नाही तर मनीष मल्होत्राने त्यांच्या दोन मुलींसाठी ड्रेस डिझाइन केले आहेत.


सोमवारी आहे सोनमची मेहेंदी...
सोनम कपूरची मेहेंदी सेरेमनी 7 मेला होणार आहे. तर लग्न 8 मेला सकाळी 11 वाजता बांद्रा येथील हेरिटेज बंगल्यात होणार आहे. संगीत आणि रिसेप्शन याच दिवशी लीला हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेय.


या सेलेब्सला मिळाले इन्विटेशन...
सोनम कपूरच्या लग्नाचे इन्विटेशन बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सला देण्यात आलेय. यामध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर, स्वरा भास्कर, राम माधवानी, अभिषेक डोगरा, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि विराटचा समावेश आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, मनीष मल्होत्राच्या डिझाइनर स्टोर पोहोचलेल्या कपूर सिस्टर्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...