आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनमने इव्हेंटमध्ये घातलेले इतके महागडे शूज, सामान्य व्यक्त खरेदी करु शकतो घर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत ती 6 आणि 7 मे या काळात लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी ती फॅशन ब्रांडच्या इव्हेंटमध्ये दुबईला गेली होती. येथे ती व्हाइट ब्लेजर आणि पँटमध्ये दिसली. आपला लूक तिने रिस्ट वॉच आणि पिंक लिपस्टिंक लावून कम्प्लीट केला. यासोबतच तिने Delpozo ब्रांडचे हाय हील शूज घातले होते. याची किंमत 2 हजार डॉलर(13 लाख रुपये) इतकी होती. 


या किंमतीत सामान्य माणूस घर खरेदी करु शकतो
- सोनमने इव्हेंटमध्ये जे शूज घातले होते. त्या शूजच्या किंमतीत सामान्य माणूस टीयर टू सिटीमध्ये 1BHK फ्लॅट खरेदी करु शकतो. एवढेच नाही तर या किंमतीत दोन मीडियम रेंजच्या कारही खरेदी केल्या जाऊ शकतात.

 

फॅशन ब्रांडचा मालक आहे आनंद...
सोनम कपूर दिर्घकाळापासून दिल्ली बेस्ड बिजनेसमन आनंद आहूजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते सीक्रेटली डेटिंग करत आहेत. हे दोघं कधी इव्हेंट्समध्ये तर कधी लंडन व्हॅकेशन्सवर दिसत असतात. आनंद फॅशन ब्रांड Bhane चा मालक आहे. त्याने व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलेय. Bhane सोनमचा फेव्हरेट फॅशन ब्राड्समधून एक आहे. अनेक वेळा ती Bhane च्या डिझाइन्स कॅरी करते.

 

सोनम-आनंदने लंडनमध्ये खरेदी केले घर
लग्नानंतर सोनम आणि आनंदर लंडनला जाणार असे वृत्त आहेत. सूत्रांनुसार आऩंदने लंडनच्या नॉटिंग हिलमध्ये दोन बेडरुमचे एक घर घरेदी केलेय. लग्नानंतर ते दोघं तिकडे शिफ्ट होणार आहेत. लग्नानंतर आता सोनम चित्रपटात काम करत राहणार, यामुळे तिचे मुंबईत येणे जाणे सुरुच राहिल. लग्न झाल्यानंतर सोनम चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. सध्या तिचा 'वीरे दी वेडिंग' हा आगामी चित्रपट आहे. जो 1 जूनला रिलीज होईल.

 

फराह खानने कन्फर्म केली होती सोनमच्या लग्नाची बातमी
कोरिओग्राफर फराह खानने एका रियालिटी शोमध्ये लग्नाची बातमी कन्फर्म करत सांगितले की, तिच्या लग्नातील काही डान्स सीक्वेंस मी कोरिओग्राफ करणार आहे. सोनमचे वडील अनिल कपूर आणि आम्ही खुप क्लोज आहोत. आम्ही एकमेकांना 'पापाजी' म्हणतात. अनिलने मला सांगितले की, तु सोनमच्या लग्नात म्यूझिक सेरेमनी कोरिओग्राफ करावी.


सुरुवातीला स्विटजरलँडमध्ये होणार होते लग्न
- रिपोर्ट्सनुसार, लग्नात 150 लोक सहभागी असतील. एवढ्या लोकांना स्विट्जरलँडला घेऊन जाण्यास अनेक अडचणी येत होत्या. यासोबतच घरातील वयस्करांना तिथे घेऊन जाण्यास अडचणी येतात. याच कारणामुळे लग्न मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आला.


या सेलेब्सला पाठवले इन्विटेशन...
- वृत्तांनुसार लग्न बांद्रा किंवा जुहूच्या एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये होऊ शकते. सध्या दीपिका पदुकोण, करीना कपूर आणि रणबीर कपूर यांना लग्नाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, इव्हेंट दरम्यान अशी होती सोनम कपूरची स्टाइल...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...