आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर आनंद आहूजाने बदलले आपले नाव, सोनम म्हणाली- मला तर माहितीही नव्हते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर सध्या आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोनमने लग्नानंतर सोशल मीडिया अकाउंटवर आपले नाव बदलले होते. तर तिचा नवरा आनंद आहूजाने इंस्टाग्रामवर आपले नाव बदलून आनंद एस आहूजा केले होते. परंतू नव-याने नाव बदलले ही हे सोनमला माहितीच नव्हते. सोनम एका मुलाखतीत स्वतः याविषयी बोलली. 
सोनमला मॅनेजर्सने सांगितले होते


- सोनमने मुलाखतीत सांगितले की, आनंदनेही लग्नानंतर नाव बदलले याविषयी मला माहिती नव्हते. मॅनेजर्सनी मला याविषयी सांगितले. मला याविषयी काहीच आयडिया नव्हती. 
- आनंदने नाव बदलले याविषयी सोनम म्हणते की, 'मला वाटते की, ही खुप कूल आणि प्रोग्रेसिव्ह प्रोसेस आहे. आनंद एक शानदार व्यक्ती आहे, त्यामुळे त्याच्यासोबत लग्न केले.'
- ती म्हणाली की, आनंद पब्लिक पर्सन नाही. यामुळे त्याची आवड-निवड याविषयी जास्त बोलणार नाही.
- तिने मुलाखतीत सांगितले की, "लोक माझ्या आयुष्यात रस घेत आहेत, याचा मला आनंद आहे. मी काय घालते, काय खाते, लग्नानंतर माझे नाव बदलून काय झाले, हेही लोकांना जाणून घ्यायचे आहे."
- 8 मे रोजी लग्नाच्या दिवशीच सोनमनेही आपल्या नावासमोर आहूजा लावले होते. यानंतर सोनमवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. एका फेमिनिस्टने असे बदलणे किती योग्य आहे याविषयीही तिला बोलण्यात आले. सोनमने म्हणाली की, नाव बदलणे ही माझी इच्छा होती. यांनंतर कळाले की, सोनमच्या पतीनेही त्याच्या नावासोबत सोनमचे इनिशियल s नावात जोडले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम आनंदचे 3 फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...