आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डायरेक्टरला डेट करतेय सोनमची लहान बहिण, बहिणीपुर्वीच आल्या होत्या लग्नाच्या बातम्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनिल कपूरची मोठी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर सध्या आपल्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. रिपोर्टनुसार 6-7 मे ला ती आपला लाँग टाइम बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सोनम कपूरच्या पर्सनल लाइफविषयी सर्वांना माहिती आहे. परंतू तिची लहान बहीण म्हणजेच रिया कपूर लव्ह लाइफविषीय खुप ओपन आहे. तिनेही आपला बॉयफ्रेंड करण बूलानीला आपल्या कुपूर कुटूंबियांना भेटवले आहे. तो तिच्यासोबत नेहमीच पार्टी, इव्हेंट्समध्ये दिसत असतो.


डायरेक्टरला डेट करतेय रिया
- रियाचा बॉयफ्रेंड करण टेलीव्हीजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पडद्यामागे काम करतो. तो अनेक चित्रपट आणि शोजमध्ये डायरेक्शन, प्रोडक्शन आणि डबिंगचे काम करतो.
- 2010 मध्ये आलेल्या 'आएशा' मध्ये काम करताना रिया आणि करणचे अफेअर सुरु झाले होते.
- 2012 मध्ये सोनमच्या लग्नाच्या बातम्यांपुर्वी रियाच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. करणचे पालक कपूर फॅमिलीला भेटायला दिल्लीमधून मुंबईत आले होते. डिसेंबर 2013 मध्ये यांच्या लग्नाची डेट फिक्स झाली होती. परंतू काही कारणांमुळे असे होऊ शकले नाही.
- ज्यावेळी कपूर फॅमिली अनिलचा 60 वा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी लंडनला गेले. तेथे आनंद आहूजासोबत रियाचा बॉयफ्रेंड करणही गेला होता. कपूर फॅमिलीच्या फोटोजमध्ये हे कपल एकत्र दिसले.

 

फॅशन डिझायनरसोबत प्रोड्यूसरही आहे रिया
- रिया एक फॅशन डिझायनर आहे. मोठी बहीण सोनमचे जास्तीत जास्त ड्रेसेस ती स्वतः डिझाइन करते. तिचा स्वतःचा फॅशन ब्रांड आहे.
- यासोबतच रियाने प्रोड्यूसर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात 'आएशा'(2010) मधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छाप पाडू शकला नाही.
- 'आएशा' नंतर रियाने सोनम कपूरसोबत 'खूबसूरत'(2014) चित्रपट बनवला. सध्या ती 'वीरे दि वेडिंग' या आगामी चित्रपटावर काम करतेय. हा चित्रपट 1 जून 2018 ला रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रिया कपूर आणि तिच्या बॉयफ्रेंडचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...