आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : आलिया भटचा 'राजी' चित्रपट 11 मे रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट एका काश्मिरी मुलीच्या ख-या आयुष्यावर आधारीत आहे. 1971 च्या युध्दाच्या दरम्यान ही मुलगी एका पाकिस्तानी सेना अधिका-यासोबत लग्न करते. चित्रपटात आलिया भट या काश्मिरी मुलीची भूमिका साकरतेय. या चित्रपटासाठी आलियाने जवळपास 4 कोटी रुपये घेतले आहे. आलियाच्या संपत्तीविषयी बोलायचे झाले तर finapp.co.in वेबसाइटच्या रिपोर्टनुसार तिच्याजवळ 4 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 25 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
ब्रांड एंडोर्समेंटमधून रोजचे 1 लाख कमावते आलिया...
- रिपोर्ट्सनुसार आलिया ब्रांड एंडोर्समेंटमधून एका वर्षाचे 3.6 कोटी रुपये (1 लाख रुपये रोज) कमावते. आलिया जवळ कोका कोला, स्टँडर्ड फॅन, फिलिप्स, कार्नेटो, गार्नियर, मेक माय ट्रिप आणि फ्रूटी सारख्या ब्रांड्सचे वस्तू आहेत. आलिया जवळ 6 कोटी रुपयांची पर्सनल इन्वेस्टमेंट आहे.
गाणे गाऊनही कमावते आलिया
- आलियाने 2014 मध्ये आलेल्या 'हायवे' मध्ये 'सूहा साहा' हे गाणे गायले होते. यांचे म्यूझिक एआर रहमानने दिले आहे. यासोबतच तिने 2016 मध्ये आलेल्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' मधील 'मै तैनू समझांवा' गा गाणअयाचे अनप्लग्ड व्हर्जन गायले होते. यासोबतच तिने 'उडता पंजाब' चे 'इक कुडी' हे गाणे गायले होते. या गाण्यांमधूनही आलियाने चांगली कमाई केली होती.
आलिया जवळ आहे स्वतःचे घर
आलिया भटचे बालपण वडील महेश भट आणि आई सोनी राजदानच्या जुहू येथील घरात गेले. आता आलियाकडे स्वतःचे अपार्टमेंट फ्लॅट आहे. हे तिला वडील महेश भटने गिफ्ट केले. हे घर जुहूच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. सध्या या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे. आलियाचे घर डायरेक्टर विकास बहलची पत्नी रिचा बहलने डिझाइन केले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलिया भटचे काही Photos...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.