आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लग्न, 2 अफेअर आणि एक लिव-इन रिलेशन, असे आहे कमल हसनचे खासगी आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे वर) कमल हसन, उजवीकडे सारिकासोबत लग्नाच्यावेळी, खाली (डावीकडे) पहिली पत्नी वाणी गणपतीसोबत, उजवीकडे दुसरी पत्नी सारिका आणि मुलगी श्रुतीसोबत. - Divya Marathi
(डावीकडे वर) कमल हसन, उजवीकडे सारिकासोबत लग्नाच्यावेळी, खाली (डावीकडे) पहिली पत्नी वाणी गणपतीसोबत, उजवीकडे दुसरी पत्नी सारिका आणि मुलगी श्रुतीसोबत.

एन्टरटेन्मेंट डेस्कः साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांनी बुधवारी राजकारणात प्रवेश केला. 7 नोव्हेंबर 1954 रोजी परमकुडी, चेन्नईत जन्मलेल्या कमल यांनी 1959 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 'अपूर्व रागंगल' हा त्यांचा पहिला लीड हीरो असलेला सिनेमा होता. यामध्ये त्यांनी त्यांच्या वयापेक्षा मोठ्या स्त्रीच्या प्रियकराची भूमिका वठवली होती.

 

या सिनेमाद्वारे झाली बी टाऊनमध्ये एन्ट्री...

बॉलिवूडमध्ये त्यांनी 'एक दुजे के लिए' या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. हा सिनेमा यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्यांनी 'सागर', 'गिरफ्तार', 'जरा सी जिंदगी', 'राज तिलक', 'एक नई पहेली', 'देखा प्यार तुम्हारा', 'चाची 420', 'हे राम', 'विश्वरूपम्' यांसह ब-याच हिंदी सिनेमांत अभिनय केला होता. 

 

पहिले लग्न वाणी गणपतीसोबत तर दुसरे सारिकासोबत... 
कमल यांनी 1978 साली वाणी गणपतीसोबत पहिले लग्न केले होते. दहा वर्षे हे लग्न टिकले आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्री सारिकाची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली. कमल आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. 2004 मध्ये कमल सारिकापासूनही विभक्त झाले.

 

कमल हासन यांच्या आयुष्यात सारिकापूर्वी आणि नंतर आल्या या महिला...
फिल्मी करिअरमध्ये यशोशिखर गाठणा-या कमल यांचे खासगी आयुष्य कायम वादात राहिले. त्यांच्या आयुष्यात सारिकापुर्वी आणि तिच्यानंतर अनेक महिला आल्या.  

 

> श्रीविद्या
70च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत कमल हसन यांचे अफेअर होते. दोघांनी काही सिनेमेसुद्धा एकत्र केले होते. मात्र फार काळ दोघांचे अफेअर टिकले नाही.

 

> वाणी गणपती
1978 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी कमल हसन यांनी डान्सर वाणी गणपतीसोबत लग्न केले. हे नाते दहा वर्षे टिकले आणि नंतर सारिकाच्या एन्ट्रीमुळे हे नाते संपुष्टात आले.

 

> सारिका
वाणीपासून विभक्त झाल्यानंतर 1988 मध्ये कमल हसन सारिकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मुलगी श्रुतीच्या जन्मानंतर दोघांनी लग्न केले.

 

> सिमरन बग्गा
एका काळानंतर सारिकासोबतसुद्धा कमल यांचे पटेनासे झाले. 2004 मध्ये सारिकासोबत कमल यांनी घटस्फोट घेतला. याकाळात सिमरन बग्गा जी कमल यांच्यापेक्षा वयाने 22 वर्षांनी लहान होती, तिच्यासोबत काही काळ त्यांचे रिलेशन होते.

 

> गौतमी तडिमल्ला
सुमारे 13 वर्षे कमल अभिनेत्री गौतमी तडिमल्लासोबत लिव्ह इनमध्ये राहिले. पण 2016 मध्ये गौतमीने कमल यांच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. गौतमीने सांगितले होते, की कमल आणि तिने 13 वर्षांचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 


पुढील स्लाईड्समध्ये बघा, कमल हसन यांचे त्यांच्या पुर्वाश्रमीच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबतचे निवडक फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...