आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलांचा पिता आहे हा सुपरस्टार, बघा साऊथ अॅक्टर्सचे फॅमिली Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः मुलगी मोक्षदा, मुलगा मानित आणि पत्नी कल्याणीसोबत रवी तेजा) - Divya Marathi
(फोटोः मुलगी मोक्षदा, मुलगा मानित आणि पत्नी कल्याणीसोबत रवी तेजा)

मुंबई/हैदराबादः दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 'मास महाराजा' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता रवी तेजाने नुकतीच वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 जानेवारी, 1968 रोजी जग्गमपेटा, आंध्रप्रदेशात जन्मलेल्या रवी तेजाचे पूर्ण नाव रविशंकर राजू भूपतिराजू आहे. 1990 मध्ये आलेल्या 'कर्तव्यम' या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्याने सहायक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. 1999मध्ये आलेल्या 'नी कोसम'द्वारे त्याने लीड अॅक्टर म्हणून करिअर सुरु केले. या चित्रपटासाठी रवीला नंदी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

 

2002 मध्ये थाटले लग्न...  
- रवी तेजाने 26 मे 2002 रोजी कल्याणीसोबत लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगी आणि एकम मुलगा आहे. त्याच्या मुलीचे नाव मोक्षदा तर मुलाचे नाव मानित भूपतिराजू आहे.
- 2012 मध्ये फोर्ब्सने रवीच्या नावाचा समावेश 100 अशा सेलिब्रिटींमध्ये केला होता, ज्यांची इनकम 15.5 कोटींहून अधिक आहे. या यादीत रवी 50 व्या स्थानावर होता.
- डायरेक्टर पुरी जगन्नाथ आणि रवी तेजा यांची जोडी सुपरहिट आहे. दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अक्षय कुमारचा राउडी राठौर हा चित्रपट रवी तेजाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 

 

एका चित्रपटासाठी 10 कोटी घेतो रवी...
- रवी तेजा साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी तो 10 कोटी रुपये मानधन घेतो. 
- याशिवाय जाहिरातींमधून त्याची मोठी कमाई होते. तो आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये लूनर फुटविअर या ब्रॅण्डचा अॅम्बेसेडर आहे. 

 

गाजलेले चित्रपट..
सिंदूरम (1997), इडियट (2002), वेंकी (2004), विक्रमकुडु (2006), दुबई सीनू (2007), कृष्णा (2008), डॉन सीनू (2010), बालुपु (2013), बंगाल टाइगर (2015), राजा द ग्रेट (2017)

 

पुढील स्लाईड्सवर बघा, साऊथ अॅक्टर्सचे फॅमिली फोटोज आणि जाणून घ्या त्यांच्याविषयी बरंच काही...  

बातम्या आणखी आहेत...