आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी या अभिनेत्रीला बघून शिटी वाजवायचे लोक, आता झाली अशी अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/चेन्नईः दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नमिता हिला बघून एकेकाळी लोक शिटी वाजवत असे. पण अलीकडेच नमिताचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये दिसणारी एकेकाळी सेक्स सिम्बॉल नमिताच आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. या व्हिडिओत नमिताच्या चेह-यावर डाग दिसत आहे, शिवाय तिच्या चेह-यावर वाढत्या वयाचाही  झालेला परिणाम स्पष्ट दिसत आहे. 1981मध्ये जन्मलेली नमिता आता 37 वर्षांची आहे. 


नोव्हेंबर 2017 मध्ये थाटले लग्न...
- नमिताने 27 नोव्हेंबर 2017 रोजी तामिळ अभिनेता आणि निर्माता वीरा उर्फ वीरेंद्र चौधरीसोबत लग्न केले. दोघांचे लग्न तिरुपतीच्या के विनायक नगरस्थित इस्कॉन मंदिरात झाले होते.
- नमिताने सांगितल्यानुसार, वीरासोबतची तिची पहिली भेट सप्टेंबर 2016 मध्ये झाली होती. नमिताचा बेस्ट फ्रेंड शशिधर बाबू यांनी दोघांची भेट घडवून आणली होती.


वीराने घातली होती नमिताला लग्नाची मागणी...
- 6 सप्टेंबर 2017 रोजी वीराने बीचवर रोमँटिक अंदाजात कँडल लाइट डिनरनंतर नमिताला लग्नाची मागणी घातली होती. या डेटविषयी नमिताने एका मुलाखतीत सांगितले होते, वीराने कँडल लाइट डिनरनंतर मला लग्नाची मागणी घातली. त्याचे शब्द ऐकून मी अचंबित झाले होते. कारण हे माझ्यासाठी स्वप्नवत होते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, एकेकाळी वडिलांच्या वयाच्या अभिनेत्यासोबत नमिताने दिले होते बोल्ड सीन्स...  

बातम्या आणखी आहेत...