आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रसिद्ध अॅक्ट्रेसमुळे मोडला होता प्रभुदेवाचा संसार, आता या व्यक्तीला करतेय डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे -  प्रभू देवा आणि उजवीकडे - सध्याचा बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत नयनतारा - Divya Marathi
डावीकडे - प्रभू देवा आणि उजवीकडे - सध्याचा बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत नयनतारा

मुंबई :  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत रिलेशनशिप आहे. दोघांनी अलीकडेच अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे एकत्र हॉलिडे एन्जॉय केला. नयनताराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर विग्नेश शिवनसोबत हॉलिडे एन्जॉय करतानाची काही छायाचित्रेसुद्धा शेअर केली आहेत. यामध्ये दोघांची स्ट्राँग बाँडिंग बघायला मिळतेय. विग्नेशपूर्वी नयनतारा अभिनेता प्रभू देवासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्यो होती. 


नयनताराला प्रेमाने या नावाने हाक मारतो शिवन..
- 2017 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या एका अवॉर्ड शोमध्ये एकत्र हजेरी लावून नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. विग्नेश नयनताराला प्रेमाने  'Thangamey' म्हणून हाक मारतो. 
- विग्नेश हा दक्षिणेतील नावाजलेला दिग्दर्शक असून तो सध्या सूर्या आणि किर्ती यांना घेऊन थाना सुरेंद्र कोट्टम हा चित्रपट बनवत आहे. 
- नयनतारा आणि विग्नेश यांनी 2018 मध्ये नानुम राऊडी थान या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. यामध्ये नयनतारासोबत विजय सेतुपती, पार्थिबन आणि राधिका या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.

 

पुढे वाचा, प्रभूदेवासोबत लग्न करण्यासाठी नयनताराने स्वीकारला होता हिंदू धर्म...