आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नमिता-रंभापासून रासी-मीनाक्षीपर्यंत, आता अशा दिसतात साऊथच्या या 12 प्रसिद्ध हीरोइन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः काळानुसार प्रत्येक व्यक्तीचे रुप बदलत जाते. बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसुद्धा आता वाढत्या वयानुसार वेगळ्या दिसू लागल्या आहेत. अनेकींना तर वाढत्या वयामुळे आता ओळखणेही कठीण झाले आहे. रंभापासून ते नमिता, भानुप्रिया, जयाप्रदा या एक काळ गाजवणा-या अभिनेत्री आता वयाच्या चाळिशीनंतर वेगळ्या दिसू लागल्या आहेत. पुर्वीच्या तुलनेत आता त्यांच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या आता पुर्वीपेक्षा खूप वेगळ्या दिसतात.

 

नमिता
नमिताचा जन्म 10 मे 1981 रोजी सूरत येथे झाला. 1998 मध्ये तिने मिस सूरत हा किताब आपल्या नावी केला होता. तिचे चित्रपटातील करिअर तेलगू चित्रपट ‘सोंथम’पासून सुरु झाले होते. त्यानंतर तिने परत कधीही मागे वळून बघितले नाही. प्रादेशिक चित्रपटात नमिताने आयटम गर्ल रुपातही स्वत:ला सादर केले आहे. त्यामुळे नमिताला 'आयटम गर्ल' म्हणूनही नवी ओळख मिळाली आहे. नमिताचे वडील सूरत शहरात रेमेंड शोरूमचे मालिक आहेत. दक्षिणेकडील राज्यात तर आता तिला देवीचे स्वरुप आले आहे.एवढेच नव्हे तर तामिळनाडूत तिची तीन मंदिरे उभारण्यात आली आहेत. नमिताने दक्षिणेतील तेलगु, तमिळ, कन्नड, मल्याळम चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटातही अभिनय केले आहे. 2006 मध्ये रिलीज झालेला 'लव्ह के चक्कर में' या हिंदी चित्रपटात नमिता झळकली होती. तिने आपले करिअर जाहिरातीपासून सुरु केले होते. ती सर्वप्रथम हिमानी क्रीमच्या जाहिरातीत नजरेस पडली होती.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, आता किती बदलला आहे दाक्षिणात्य अभिनेत्रींचा LOOK...

बातम्या आणखी आहेत...