आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी असा दिसायचा हा अॅक्टर, या भयंकर घटनेमुळे शरीरावर उरले नाहीत केस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/चेन्नईः दाक्षिणात्य चित्रपटांमधील स्टंट सीन्स अधिक पसंत केले जातात. याच कारणामुळे दक्षिणेतील प्रत्येक दुस-या चित्रपटात स्टंट सीन हमखास बघायला मिळतात. साऊथमध्ये स्टंटमनविषयी बोलायचे झाल्यास पहिलं नाव येतं ते अभिनेता राजेंद्रन यांचे. 1 जून 1957 रोजी तामिळनाडूच्या थोत्तुकुडी येथे जन्मलेले राजेंद्रन यांचे पूर्ण नाव मोट्टा राजेंद्रन आहे. दक्षिणेतील सुमारे 500 चित्रपटांमध्ये त्यांनी स्टंटमन म्हणून काम केलंय.   


स्टंट करताना केमिकलच्या पाण्यात घेतली होती उडी...
- राजेंद्रन यांच्या शरीरावर एकही केस नाही. पण ते जन्मापासून असे दिसत नव्हते. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे ते दिसायचे. पण एका घटनेनंतर त्यांच्या शरीरावरील सर्व केस जळाले होते. 
- घडले असे होते, की कलपेट्टामध्ये एका मल्याळम चित्रपटाच्या शूटिंगवेळी राजेंद्रन यांना स्टंट करताना बाइकसोबत पाण्यात उडी घ्यायची होती. पण त्यांनी ज्या पाण्यात उडी घेतली, ते पाणी केमिकल वेस्ट मिश्रित होते. एका खासगी कंपनीतून निघणारे केमिकल वेस्ट त्या पाण्यात मिसळले गेले होते.
- अॅलर्जिक रिअॅक्शनमुळे त्यांच्या शरीरावरील सर्व केस जळून गेले. त्यांच्या भुवया आणि डोक्यावरचे केसदेखील जळले. 


पुढे वाचा, अपघातानंतर व्हिलनच्या रुपात मिळाली राजेंद्रन यांना ओळख...