आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रीमा लागूंच्‍या अभिनयामुळे अस्‍वस्‍थ झाली होती श्रीदेवी, कट केला होता रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवी 90च्‍या दशकातील एक सुपरस्‍टार अॅक्‍ट्रेस होती. ती बॉलिवूडमधील अशा मोजक्‍या अॅक्‍ट्रेसपैकी होती, ज्‍यांच्‍या कोणत्‍याही गोष्‍टीला नकार देणे डायरेक्‍टर-प्रोड्यूसरला जमत नसे. मात्र या झगमगत्‍या दुनियेतील एक सत्‍य म्‍हणजे येथे यशासोबतच असुरक्षिततेची भावनाही कलाकाराच्‍या मनात घर करायला लागते. यामुळे एका सुपरस्‍टारला प्रतिस्‍पर्धी म्‍हणून दुसरे कोणी अजिबात सहन होत नाही. आपले स्‍वत:चे करिअर वाचवण्‍यासाठी ते दुस-याचे करिअर संपवण्‍याचा प्रयत्‍न करतात. असाच एक किस्‍सा घडला आहे श्रीदेवी आणि रिमा लागू यांच्‍यासोबत.


हा किस्‍सा आहे 1993 मध्‍ये रिलीज झालेल्‍या 'गूमराह' सिनेमाचा. या सिनेमात श्रीदेवी लीड अॅक्‍ट्रेस होती व रिमा लागूंनी तिच्‍या आईची भूमिका साकारली होती. मात्र सिनेमात रिमा लागूंनी आपली भुमिका एवढी सुंदर वठवली होती की, त्‍यांना मिळणा-या प्रंशसेमुळे श्रीदेवी प्रचंड अस्‍वस्‍थ झाली होती. तसे तर यावेळी श्रीदेवीचे स्‍टारडम आणि स्‍टेटस रिमा लागूंपेक्षा कितीतरी मोठे होते. मात्र तरीही रिमा लागूंच्‍या अभिनयामुळे आपली भुमिका झाकोळली जाईल, अशी चिंता श्रीदेवीला होती. अखेर श्रीदेवीने सिनेमाच्‍या डायरेक्‍टर-प्रोड्यूसर्संना सांगून रिमा लागूंच्‍या भुमिकेची लांबी छोटी केली होती. त्‍यांचे सिनेमातील अनेक महत्‍त्‍वाचे सीन्‍स श्रीदेवीने कट करायला लावले होते. अशा प्रकारे श्रीदेवीच्‍या इगोचा फटका रीमा लागूंना बसला होता.     

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या सिनेमातील रीमा लागू आणि श्रीदेवीचे काही दृश्‍ये...

बातम्या आणखी आहेत...