आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevi 28 Year Old Close Friend Manish Malhotra Revealed Last Day Conversation In Dubai

28 वर्षे जुन्या मित्राने व्यक्त केले दुःख, म्हणाला - असे वाटतेकी श्रीदेवी मला फोन करेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शुक्रवारी झालेल्या 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींना सर्वोकृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीदेवींना 'मॉम'(2017) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. याच काळात सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राने पहिल्यांदा फॅशन मॅग्जीन वोगला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवीसंबंधीत एक गोष्ट शेअर केली.

 

मृत्यूपुर्वी श्रीदेवी आणि मनीषमध्ये झाले होते असे बोलणे
- मनीषने सांगितले की, ज्या रात्री श्रीदेवी आपल्याला सोडून गेल्या. त्या संध्याकाळी आम्ही दोघं जान्हवीच्या डेब्यू फिल्मविषयी बोललो होतो.
- माझ्या जीवनातील जवळचा व्यक्ती मला सोडून जाण्याची ही पहिली वेळ आहे. ही फिलिंग खुप इमोशनल आहे. मी श्रीदेवीला 28 वर्षांपासून ओळखत होतो.
- "मृत्यूपुर्वी आम्ही सर्वच गोष्टींवर चर्चा केली. जान्हवीच्या फिल्म डेब्यू पासून तर खुशी कपूरच्या लग्नातील लूकपर्यंत"
- "त्या रात्री श्रीदेवी मला म्हणत होत्या की, खुशी लग्ना किती सुंदर दिसतेय. मला त्यांन त्या रात्री काय काय खाल्ले हेही आठवते."
- "श्रीदेवींच्या मृत्यूला 1 महिना होऊन गेलाय. परंतू मला अजूनही वाटते की, माझा फोन वाजेल आणि समोरुन त्यांचा आवाज येईल."
- "आम्ही आउटफिटविषयी खुप बोलू आणि आमच्या ठरलेल्या प्रोजक्टविषयी चर्चा करु"

 

कधीच गॉसिप करायच्या नाही श्रीदेवी
- मनीषने पुढे सांगितले की, "मला आठवते आमच्यामध्ये कधीच गॉसिप झाले नाही. आम्ही फक्त कपडे, फूड आणि चित्रपटांविषयी बोलायचो, या आयुष्यातील चांगल्या गोष्टी असतात."
- "त्या कधीच कुणाविषयी वाईट बोलायच्या नाहीत. एवढेच काय तर त्या आपल्या स्पर्धकांविषयीही कधीच बोलायच्या नाहीत."
- "श्रीदेवी कमर्शिअल आणि आर्ट हाउस चित्रपटात फरक मानत नव्हत्या. मग तो सिली सीन्स असो किंवा एखाद्या गाण्याचा पाथ ब्रेकिंग परफॉर्मेंस"

 

आता जान्हवीसाठी ड्रेसेस डिझाइन करत आहेत मनीष
- मनीष सध्या श्रीदेवींची मुलगी जान्हवीसाठी ड्रेस डिझाइन करत आहेत. मनीषने सांगितले की, "आयुष्य कसे गोल आहे, यावर हसू येते."
- "श्रीदेवीच्या दोन्ही मुलगी जान्हवी आणि खुशी लहान होत्या तेव्हा मी त्यांच्यासाठी लहान-लहान घाघरा-चोली डिझाइन करायचो"
- "आता मी जान्हवीची डेब्यू फिल्म 'धडक' साठी कॉस्ट्यूम डिझाइन करतोय. जान्हवीही आईप्रमाणे टॅलेन्टेंड आहे. पुर्णपणे डिसीप्लिंड आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि मनीष मल्होत्राचे काही निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...