आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवीची फॅन झाली 'धडक'ची टीम, सेटवर श्रीदेवींची कार्बन कॉपी दिसली त्यांची लेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूर 20 जुलै रोजी रिलीज होत असलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट सैराट या ब्लॉकबस्टर या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. शूटिंगवर हजर असलेल्या सूत्रांनुसार, चित्रपटात हीरो आणि हीरोईन राजस्थानी बॅकगाऊंड असलेले दाखवण्यात आले आहे. प्रेमात पडल्यानंतर लग्नासाठी पालकांची परवानगी मिळत नसल्याचे बघून दोघे कोलकाताला पळून जातात. मोठ्या कष्टाने दोघे स्वतःला सावरतात आणि लग्न थाटतात. पण नशीब दोघांची  कशी क्रूर थट्टा करते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

 

'सैराट' या चित्रपटात हीरो-हिरोईनला महाराष्ट्राची पार्श्वभूमी होती. दोघे महाराष्ट्रातील एका छोट्या गावातून पळून हैदराबादला पळून जातात आणि तिथे गेल्यानंतर दोघे हॉरर किलींगला बळी पडतात. धडकमध्ये आता हॉरर किलींगचा मुद्दा उचलण्यात आला आहे, की त्याचा शेवट काही वेगळा करण्यात आला आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. 


श्रीदेवींची कार्बन कॉपी दिसते जान्हवी...
‘धडक’चे दिग्दर्शक शशांक खेताना आहेत.  यापूर्वी त्यांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्‍हनिया’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात आशुतोष राणा यांनी आलिया भटच्या वडिलांची भूमिका वठवली होती. तर धडकमध्येही आशुतोष राणा यांनीच जान्हवी कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. जान्हवीच्या स्क्रिन प्रेजेंसनी चित्रपटातील इतर को-स्टार अतिशय प्रभावित झाले. टीमने सांगितल्यानुसार, जान्हवी खासगी आयुष्यात तिची दिवंगत आई श्रीदेवींची कार्बन कॉपी आहे. श्रीदेवी यांच्याप्रमाणेच जान्हवीसुद्धा अनोळखी लोकांपासून दूर राहते. स्वतःविषयी फारसे बोलणे तिला पसंत नाही. शशांक खेतान यांनी शूटिंगपूर्वी जान्हवीला अनेक वर्कशॉप करायला सांगितले होते. पण चित्रपटासाठी त्यांनी सैराटचा हीरो आकाश आणि हिरोईन रिंकू राजगुरु यांच्याकडून इनपूट घेतले नाहीतो. 


‘धडक’चे संगीत ‘सैराट’चेच, फक्त शब्द नवीन असतील...
'धडक'चे संगीत अजय-अतुल यांनीच दिले आहे. 'धडक'चे संगीत सैराटचेच ठेवावे, असे करण जोहर यांनी अजय-अतुल यांना सांगितले होते. गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांना मराठी संगीताला साजेशे हिंदी शब्द तयार करायला सांगितले गेले. अमिताभ यांनी ‘सैराट’च्या संगीताला अनुसरुन 'धडक'चे संगीत तयार केले आहे. 'सैराट' हा चित्रपट म्युझिकली हिट ठरला होता. 'धडक'कडूनही आता अशीच आशा व्यक्त केली जात आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, 'धडक'च्या सेटवरील जान्हवी आणि ईशानचा अंदाज...  

बातम्या आणखी आहेत...