आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युरी हेडचा धक्कादायक खुलासा, फक्त या कारणासाठी श्रीदेवींना देण्यात आला राष्ट्रीय पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शुक्रवारी नवी दिल्लीत 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना जाहीर झाला. श्रीदेवी यांना मरणोत्तर हा पुरस्कार घोषित झाला. विशेष म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या निवड समीतीचे अध्यक्ष शेखर कपूर मात्र हा पुरस्कार श्रीदेवी यांना देण्याच्या विरोधात होते. हा खुलासा स्वतः शेखर कपूर यांनी केला आहे. त्यांनी 10 जणांच्या निवड समितीला हा पुरस्कार श्रीदेवी यांना द्यायला नको, असे म्हटले होते. एका रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी यांना हा पुरस्कार देण्याला शेखर कपूर यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. रिपोर्टमध्ये असलेल्या उल्लेखानुसार, शेखर कपूर यांनी नॉमिनेटेट अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेसची यादी बघून निवड समितीच्या सदस्यांना सल्ला दिला होता, की या यादीत श्रीदेवी यांच्या नावाचा उल्लेख टाळायला हवा होता.

 

वारंवार वोटिंग केल्यानंतर यायचे श्रीदेवी यांचेच नाव...
- रिपोर्ट्सनुसार, शेखर कपूर यांनी सर्व ज्युरी मेंबर्सना वारंवार वोटिंग आणि इतर नॉमिनीजच्या नावाचा विचार करायला सांगितले होते. पण श्रीदेवी यांनाच सर्वाधिक मतं मिळतं गेली. श्रीदेवी यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याच्या विरोधात शेखर कपूर एकमेव होते. शेखर कपूर यांच्या मते, श्रीदेवी आता या जगात नाहीत, म्हणूनच इतर ज्युरी मेंबर्सनी त्यांच्या नावावर अधिक जोर दिला. त्यांच्या मते, गेल्या दहा-बारा वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असलेल्या अभिनेत्रींवर हा अन्याय आहे. विशेष म्हणजे शेखर कपूर श्रीदेवींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.


पुढे वाचा, श्रीदेवींच्या करिअरमधील पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आणि तोही मरणोत्तर...  

बातम्या आणखी आहेत...