आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या \'चालबाज\'ला पूर्ण झाली 26 वर्षे, फोटोजमध्ये बघा अॅक्ट्रेसचे RARE LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः श्रीदेवी स्टारर 'चालबाज' या चित्रपटाच्या रिलीजला 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1983 साली रिलीज झालेल्या या चित्रपटात श्रीदेवीने दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्रीदेवीसोबत सनी देओल आणि रजनीकांत लीड रोलमध्ये होते. अनेक सुपहिट चित्रपट देणा-या श्रीदेवीचा यावर्षी मॉम हा चित्रपट रिलीज झाला होता. लग्नानंतर निवडक चित्रपट केल्यानंतर श्रीदेवीने चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता.

 

2012 साली आलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातून तिने पुनरागमन केले होते. बालकलाकाराच्या रुपात अभिनय करिअरला सुरुवात करणा-या श्रीदेवीला करिअरचा सुरुवातीच्या काळात फारसे यश मिळाले नव्हते. पण 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' या चित्रपटातून ती एका रात्रीतून स्टार झाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. आजवर फॅन्सनी श्रीदेवीचे अनेक ग्लॅमरस फोटोज बघितले, पण आज आम्ही तुमच्यासाठी तिच्या अतिशय जुन्या छायाचित्रांचा नजराणा घेऊन आलो आहोत. 


अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये केले काम...

श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (1978), 'हिम्मतवाला' (1983), 'मवाली' (1983), 'तोहफा' (1984), 'नगीना' (1986), 'घर संसार' (1986), 'आखिरी रास्ता' (1986), 'कर्मा' (1986), 'मि. इंडिया' (1987) सह अनेक हिट चित्रपटांत अभिनय केला आहे. 1996 मध्ये प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत तिने लग्न थाटले. 'मि. इंडिया' (1987) या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. आता जान्हवीदेखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ती लवकरच 'धडक' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवीचे रेअर फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...