आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 4 वर्षांत बदलला श्रीदेवींची लेक खुशीचा LOOK, मॉडेलिंगनंतर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कमी उंची, वाढलेले वजन, सावळा रंग आणि दातांना क्लिप... एकेकाळी असा होता श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूरचा लूक. पण आज मात्र 17 वर्षीय खुशी अतिशय ग्लॅमरस आणि प्रसिद्ध स्टार किड बनली आहे. अवघ्या चार वर्षांत तिच्यात हा कमालीचा बदल झाला आहे. पार्टीज, इव्हेंट्स आणि फ्रेंड्ससोबत मस्ती करताना खुशी कायम दिसत असते. सूत्रांच्या माहितीनुसार, मॉडेलिंग क्षेत्रात खुशीला करिअर करायचे आहे. या क्षेत्रात नाम कमावल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री घ्यायची आहे. खुशीची थोरली बहीण जान्हवी कपूर आगामी धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जान्हवीचा 'धडक' हा चित्रपट येत्या 20 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.

 

मुंबईतील धीरुभाई अंबानी इंरटनॅशनल स्कूलमध्ये शिकली आहे खुशी... 

- धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेल्या खुशीची मॉडेल व्हायची इच्छा आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मॉडेलिंगचे ट्रेनिंग घेणार आहे. मॉडेलिंगनंतर ती सिनेसृष्टीत करिअर करणार आहे.
- श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की खुशी नक्कीच चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल, पण त्यापूर्वी ती तिचे शिक्षण पूर्ण करेल. तर जान्हवीने मुलाखतीत सांगितले होते, की खरं तर खुशीने सिनेसृष्टीत येऊ नये, अशी आईची इच्छा होती. पण खुशीच्या इच्छेखातर आईने खुशीला या क्षेत्रात येण्याची परवानगी दिली होती.
- जान्हवीच्या मते, खुशी तिच्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि इंडिपेंडेंट आहे. खुशी आईसारखी तिची काळजी घेते. 

बातम्या आणखी आहेत...