आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी यांच्या न ऐकलेल्या गोष्टी : प्रत्येक चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करु इच्छित होते जितेंद्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा हार्टअटॅकमुळे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी पति बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशीसोबत रविवारी दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नात गेली होती. तिथेच ही दुःखद घटना घडली. 2017 मध्ये श्रीदेवीला चित्रपटसृष्टीत 50 वर्ष पुर्ण झाले होते. 13 ऑगस्ट 1963 मध्ये शिवकाशी, तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवीने 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलेय. जितेंद्र यांनी 'हिम्मतवाला' चित्रपटात श्रीदेवीसोबत काम केले होते. या भूमिकेमुळे ते इतके प्रभावित झाले होते की, आपल्या प्रत्येक चित्रपटात त्यांना श्रीदेवीच हिरोइन हवी होती.


श्रीदेवीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंबंधीत अनेक गोष्टी जास्तीत जास्त लोकांना माहिती नाही. या गोष्टी जाणुन घेण्यासाठी divyamarathi.com ने श्रीदेवींचे कलीग शक्ति कपूर, रोहिणी हट्टंगडी शिल्पा शिरोडकर यांच्यासोबतच बातचित केली. जाणुन घ्या ते का म्हणले.

शक्ति कपूर म्हणाले...


शक्ति कपूर आणि श्रीदेवींची पहिली भेट 1983 मध्ये 'हिम्मतवाला' च्या सेटवर झाली. हे आठवत शक्ति कपूर म्हणाले की, "राजमुंदरीमध्ये चित्रपटाची आउटडोर शूटिंग सुरु होती. श्रीदेवी आई आणि बहिणीसोबत सेटवर पोहचली होती. मी पाहिलं की त्यांना हिंदीत बोलता येत नव्हत. श्रीदेवी इंग्रजीत बोलत होती. मी नेहमीच बघायचो की, ब्रेकमध्ये त्या इतर अभिनेत्रींप्रमाणे गॉसिप करत नसत. त्या फॉर्मली लोकांसोबत बोलायच्या आणि आपली स्क्रिप्ट वाचत राहात. मी नेहमी त्यांचा सन्मान करत आलोय. माझी चेअर नेहमी त्यांना द्यायचो."

 

प्रत्येक चित्रपटात श्रीदेवी असावी असे वाटायचे
- शक्ति कपूर सांगतात की, "'हिम्मतवाला' चित्रपटा जितेंद्रला श्रीदेवीचे काम इतके आवडले की, प्रत्येक चित्रपटात हिच हिरोइन हवी अशी मागणी त्यांनी डायरेक्टर के. राघवेंद्र राव यांना केली. कदाचित याच कारणामुळे दोघांनी 'हम्मतवाला'नंतर  'जानी दोस्त' (1983), 'जस्टिस चौधरी' (1983), 'तोहफा' (1984), 'सुहागन' (1986), 'धर्म अधिकारी' (1986) आणि 'दिल लगाके देखो' (1988) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, श्रीदेवींसंबंधीत काही इंट्रेस्टिंग गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...