आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीसोबत सावलीसारखा वावरत होता हा मराठमोळा तरुण, जाणून घ्या काय होते दोघांचे नाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी यांच्यासोबत सुभाष शिंदे - Divya Marathi
श्रीदेवी यांच्यासोबत सुभाष शिंदे

चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. 24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर श्रीदेवी आज या जगात नाहीत, यावर अजून त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा आणि चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. अशीच काही अवस्था झाली आहे, सतत त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणा-या मराठमोळ्या सुभाष शिंदेची. आपल्याला सुभाष यांच्याविषयी फारसे ठाऊक नसेल. पण सुभाष श्रीदेवी यांच्या अतिशय जवळची व्यक्ती होती.

 

सुभाष हे श्रीदेवी यांचे मेकअप आर्टिस्ट होते. अगदी दुबईत झालेल्या लग्नाच्या वेळी जेव्हा श्रीदेवी यांनी त्यांच्या चेह-याला शेवटचा रंग लावला, तो हातदेखील सुभाष यांचाच. चित्रपट असो, पार्टी असो, किंवा फॅमिली फंक्शन असो सुभाष हेच श्रीदेवी यांचा मेकअप करत असतं. श्रीदेवी यांच्या निधनामुळे सुभाष शोकाकुल झाले आहेत. अलीकडेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुभाष यांनी श्रीदेवी यांच्या आठवणींना वाट मोकळी करुन दिली. 

 

आई-मुलाचे होते नाते...
मुलाखतीत सुभाष यांनी सांगितले, की त्यांचे आणि श्रीदेवी यांचे नाते आई-मुलाचे होते. गेल्या आठ वर्षांपासून सुभाष श्रीदेवीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. गेल्या आठवड्यात दुबईत झालेल्या मोहित मारवाहच्या लग्नातदेखील सुभाष श्रीदेवीसोबत तेथे गेले होते. लग्नाच्या चारही फंक्शनसाठी त्यांनीच श्रीदेवी यांचा मेकअप केला होता. 


अशी झाली होती श्रीदेवीसोबत ओळख...
सुभाष शिंदे यांनी सांगितल्यानुसार, सात ते आठ वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी त्यांनी श्रीदेवी यांचा मेकअप केला होता. त्यावेळी श्रीदेवी यांना त्यांचे काम एवढे पसंत पडले, की पुढे तेच त्यांचा मेकअप करु लागले. 


'पुली' आणि 'मॉम' चित्रपटांसाठी केला होता मेकअप...
श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'पुली' आणि 'मॉम' या चित्रपटांसाठी सुभाष शिंदे यांनीच श्रीदेवी यांचा मेकअप केला होता. 

 

नॅचरल ब्युटी होत्या श्रीदेवी...

श्रीदेवी यांना नैसर्गिस सौंदर्याची देणगी लाभली होती. त्यांच्या मेकअप करताना कधीच टेन्शन आले नाही. साधे काजळ किंवा लिपस्टिक जरी त्यांच्या चेह-याला लावले, तरी त्यांचा चेहरा खुलून दिसायचा, असे सुभाष म्हणाले. इतकेच नाही तर श्रीदेवी  यांच्यासोबत काम करताना कधीच दडपण आले नाही. काम करताना त्या स्टाफसोबत नेहमी फ्रेंडली वागायच्या, मजा-मस्तीत आम्ही सगळे त्यांच्यासोबत काम करायचो, असे सुभाष शिंदे यांनी सांगितले.  श्रीदेवी यांच्या निधनाने आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सुभाष यांनी व्यक्त केली आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवी आणि सुभाष शिंदे यांची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...