आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटी फीस घेणा-या पहिल्या अभिनेत्री होत्या श्रीदेवी, सलमानलाही वाटायची भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री दुबईमध्ये निधन झाले. भाचा मोहित मारवाह यांच्या लग्नाला त्या दुबईमध्ये गेल्या होत्या. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट, 1963 मध्ये तामिळनाडुचे लहानशे गाव मीनमपट्टीमध्ये झाले होते. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली. 1976 मध्ये 'मुंदरु मुदिची' कचित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांच्यासोबत काम करायला हिरोइन नाही तर हिरोही घाबरत असत.


बॉलिवूडमध्ये त्यांनी 1979 मध्ये 'सोलहवां सावन' या चित्रपटातून पदार्पण केले. परंतू हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. 1983 मध्ये श्रीदेवीने 'हिम्मतवाला' या चित्रपटातून बॉलिवूमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 80 ते 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची जादू होती. या काळात फक्त हिरोइन नाही तर हिरोंनाही इनसिक्योर फिल होत असत.


1 कोटी फिस घेणारी पहिली अभिनेत्री बनली श्रीदेवी
बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा जास्त फिस मिळते. परंतू 80 आणि 90 च्या दशकात प्रोड्यूसर-डाययेक्टर श्रीदेवीला फिल्म हिट करण्याचा सर्वात मोठा फॉर्म्यूला मानत होते. याच कारणांमुळे त्यांची फिस 1 कोटी रुपये होती.


सलमानला श्रीदेवीकडून इनसिक्योर वाटत होते
आज बॉलिवूडमध्ये सलमानचा राज आहे. परंतू एक काळ असा होता, जेव्हा सलमानला श्रीदेवीसोबत काम करायची भीती वाटायची. एका मुलाखतीत सलमानने हे स्पष्ट केले होते. यामागचे कारण म्हणजे, ज्या चित्रपटात श्रीदेवी असायची, त्यामध्ये प्रेक्षक हे दुस-या कलाकाराला महत्त्व देत नव्हते. श्रीदेवीने सलमानसोबत 'चंद्रमुखी' आणि 'चांद का टुकडा' सारख्या चित्रपटात काम केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सलमान आणि श्रीदेवीसोबतचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...