आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी-लाखापासून ते ईश्वर काकापर्यंत, कुणी या जगात नाहीत तर कुणी आहेत आता येथे बिझी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आमिर खानच्या 'लगान' या चित्रपटातील ईश्वर काका अर्थातच अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. रविवारी (07 जानेवारी) जयपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2013मध्ये एका सिनेमाच्या सेटवर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या उपचारांसाठी जैसलमेरहून जयपूरमध्ये आले. त्यांच्या पत्नी शोभा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिने अँड टीवी आर्टिस्ट एसोसिएशन (सिंटा) त्यांना आर्थिक मदत केली होती.  


या सिनेमातील कलाकारांविषयी सांगायचे म्हणजे, यातील काही कलाकार आता हयात नाहीत, तर काही चित्रपट आणि मालिकांमध्ये बिझी आहेत. उदाहरणार्थ या सिनेमात 'गुरन' नावाचे पात्र साकारणारे अभिनेते राजेश विवेक आता या जगात नाहीये. तसेच कॅप्टन एंड्र्यू रसेलचे पात्र वठवणारा ब्रिटीश अभिनेता आता 'गेंडा बचाओ कॅम्पेन'शी जुळला आहे. सिनेमातील अनेक कलाकार आता कुठे आणि कशात बिझी आहेत, तसेच गेल्या 17 वर्षांत त्यांच्या लूकमध्ये किती बदल झाला आहे, याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


ग्रेसी सिंह
सिनेमातील भूमिकाः गौरी

'लगान'नंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'गंगाजल' सिनेमांत अभिनय करणारी अभिनेत्री ग्रेसी सिंह आता छोट्या पडद्यावरील 'संतोषी मां' या मालिकेत काम करत आहे. ग्रेसी उज्जैनमध्ये झालेल्या सिंहस्थमध्ये सहभागी झाली होती. 'अमानत' या टीव्ही मालिकेतसुद्धा ग्रेसीने काम केले आहे. दीर्घ काळानंतर ग्रेसी 'संतोषी माँ' या मालिकेत दिसली होती.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'लगान'च्या इतर स्टारकास्टचे पूर्वी आणि आताचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...