आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये Flop ठरली शमिता, हिट स्टार्सचे हे बहीणभावंडही राहिले Unsuccessful

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 39 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. बातम्यांनुसार, ती इंटेरिअर डिझाइनिंगमध्ये करिअर करत आहे. 2014 मध्ये तिने सिनेमांमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. बॉलिवूडमध्ये शमिताची ओळख अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून होती.


अनेक सिनेमे केले तरी नाही मिळाली लोकप्रियता-
मोहब्बतें, जहरसारख्या सिनेमे केल्यानंतरसुध्दा शमिताला प्रसिध्दी मिळाली नाही. बोल्ड इमेजसुध्दा तिच्या कामी आली नाही. शमिताने अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या मात्र यश काही तिच्या पदरी पडले नाही. शमिता टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या तिस-या पर्वात झळकली होती.


शमिताची थोरली बहीण शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे सिनेसृष्टीत काम केले आणि बरेच हिट सिनेमे दिले. शिवाय तिची गिनती बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री आणि यम्मी मम्मींमध्ये केली जाते. शिल्पा आई झाल्यानंतरसुध्दा पार्ट्या आणि इव्हेंट्समध्ये फिट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते.


हे स्टार सिबलिंगसुद्धा ठरले आहेत फ्लॉप
शमिताप्रमाणे बॉलिवूडमध्ये अनेक फ्लॉप स्टार्स आहेत ज्यांच्या बहीण-भावंडांनी सिनेमांत नाव कमावले आणि करिअर हिट केले. यामध्ये सलमान खानचा भाऊ सोहेल खान, आमिर खानचा भाऊ फैजल खान, सैफ अली खानची बहीण सोहा अली खानसह अनेक कलाकार आहेत.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हिट सेलेब्सच्या  unsuccessful ठरलेल्या बहीणभावंडांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...