आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा दीपक तिजोरीच्या Glamours मुलीला, वयाच्या 13 व्या वर्षी झाली होती किडनॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'आशिकी', 'सडक', 'खिलाडी' यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेला हॅण्डसम अभिनेता दीपक तिजोरी दीर्घ काळापासून अभिनयापासून दूर आहे. अलीकडेच तो दिवंगत अभिनेते नीरज वोरा यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला होता. यावेळी  वाढलेल्या दाढीमिशा आणि वजनामुळे हा दीपक तिजोरीच आहे, हे ओळखणे कठीण झाले होते. दीपक तिजोरी त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे सध्या बराच चर्चेत आहे. त्याला त्याची पत्नी शिवानी तनेजाने घराबाहेर काढल्याचे वृत्त चर्चेत आहे. या दाम्पत्याला समारा ही एक मुलगी आणि करण हा एक मुलगा आहे. 


20 वर्षांची आहे मुलगी..
दीपक तिजोरी आणि शिवानी यांची लेक समारा आता 20 वर्षांची झाली आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर समारा अॅक्टिव आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज बघायला मिळतात. तिने केलेल्या विविध फोटोशूटची झलक लक्ष वेधून घेते.  

 

वयाच्या 13 व्या वर्षी झाले होते समाराचे अपहरण... 
समारा 13 वर्षांची असताना तिचे अपहरण झाले होते. एका मुलाखतीत स्वतः दीपकने ही गोष्ट शेअर केली होती. 10 मे 2009 रोजी  घडलेल्या या घटनेविषयी दीपकने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते, की लोखंडवालाच्या रस्त्यावरून जाताना काही लोकांनी तिला ऑटोत बसवून एका हॉटेलात नेले होते. मात्र समारा त्यांच्या तावडीतून पळून आली होती.

 

वरुण-जॉनच्या चित्रपटाच्या टीमसोबत केलंय काम... 
समाराच्या शिक्षणाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिला चित्रपटसृष्टीबाबत आवड असल्याचे स्पष्ट होते. वरुण धवन आणि जॉन अब्राहम स्टारर 'ढिशूम' या चित्रपटाच्या टीमसोबत समाराने काम केल्याचे तिने शेअर केलेल्या छायाचित्रांवरुन दिसून येतं. ढिशूम चित्रपटाचा क्लॅप देतानाचे तिचे फोटो इन्स्टाग्रामवर आहेत. याशिवाय जॉन अब्राहमसोबतचेही तिची छायाचित्रे आहेत.  

 

पुढील स्लाइड्सवर बघा, दीपक तिजोरीची लाडकी लेक समारा तिजोरीचे लक्ष वेधून घेणारे  PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...