आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णी आज 46 वर्षांची झाली आहे. 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या ममता कुलकर्णीची इमेज अगोदरपासून बोल्ड अशीच होती. इंडस्ट्रीत नवीन असतानाच ममता कुलकर्णीने टॉपलेस फोटोशूट करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. परिणामतः या फोटोशूटनंतर तिची लोकप्रियता वाढत गेली. 2015 साली या फोटोशूटचे फोटोग्राफर जयेश सेठ यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ममताबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. तर या फोटोशूटवेळी घडलेल्या गोष्टीही सांगितल्या.
ज्याकाळी क्लीवेज शोसुद्धा एक मोठा मुद्दा होता, त्यावेळी ममताने केलेले हे फोटोशूट फारच धाडसी पाऊल होते. पण हे करण्याअगोदर ममता कुलकर्णी फारच घाबरली होती. ती म्हणाली होती, असे केल्याने मला माझ्या घरातून आणि चित्रपटसृष्टीतून बाहेर काढले जाईल.
- जयेश यांनी सांगितल्यानुसार, ही 1993 ची गोष्ट आहे. ममता एका रुढीवादी मीडल क्लास मराठी कुटुंबातून आली होती.
- त्यावेळी आम्ही स्टारडस्टसाठी कव्हर शूटच्या तयारीत होतो. एडिटोरीअलमध्ये काहीतरी सेन्शुअस असे फोटोशूट व्हावे, असे ठरले.
- त्यावेळी क्लीवेज शोसुद्धा फार मोठा मुद्दा होता.
जूही, माधुरीने दिला होता शूटसाठी नकार..
- जयेश यांना या शूटसाठी सोज्वळ चेहरा आणि कमनीय बांधा असलेल्या अभिनेत्रीची गरज होती. त्यांनी माधूरी, जूहीला विचारले असता त्यांनी ते करण्यास नकार दिला, कारण त्यावेळी त्या प्रस्थापित अभिनेत्री बनल्या होत्या.
- तेव्हा आम्ही नव्या चेहऱ्याच्या शोधात लागलो. अनेक अभिनेत्रींचे नाव समोर आले त्यात ममता एक होती. ममताची त्यावेळी कोणतीच इमेज नव्हती आणि हेच आम्हाला हवे होते.
शूटबद्दल विचारले असता ममता घाबरली होती...
- जयेश यांनी कवर शूटसाठी ममताला विचारले तेव्हा ती जरा चरकली. खरंच असे होणार आहे का? असे तिने विचारले. त्यात तिला सांगण्यात आले, की बॉडीचा फक्त वरील भाग रिव्हिल करावा लागणार आहे आणि त्यात कोणताही प्रायव्हेट पार्ट दिसणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे तिला सांगितले.
- ममताने सर्व ऐकून घेतले, पण ती नर्व्हस झाली. तिने विचार करण्यासाठी वेळ द्या असे सांगितले.
वाचा पुढील स्लाईडवर... या अटीवर तयार झाली ममता...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.