आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#SAJNUला का मिळाली बोर्डींगची शिक्षा? रंजक आहे त्याच्या आयुष्यातील हा किस्सा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त याचा जीवनपट उलगडणारा 'संजू' हा चित्रपट लवकरच फॅन्सच्या भेटीला येतोय. संजय दत्तच्या जीवनातील अनेक प्रसंग या चित्रपटातून त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. पण या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या संजूच्या पूर्वायुष्याविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. संजूबाबाच्या जीवनातील असाच एक खास किस्सा आपण आज जाणून घेणार आहोत. 


संजय दत्तच्या जीवनातील तशा अनेक गोष्टी आता जगासमोर आलेल्या आहेत. त्याच्या आयुष्याबद्दल बरेच काही सर्वांना माहिती आहे. संजय दत्त लहान असताना त्याला सुनील दत्त आणि नर्गिस यांनी बोर्डींग स्कूल मध्ये टाकल्याचेही सर्वांना माहिती आहे. पण त्याला बोर्डिंगमध्ये का घातले होते, त्या मागचा किस्सा फारसा समोर आलेला नाही. हा किस्साही संजय दत्त यांच्या खोडकर स्वभावाची ओळख करून देणारा आहे. काही वर्षांपूर्वी संजय दत्तने स्वतः एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. 


सिगारेटच्या थोटकांमुळे पोहोचला बोर्डिंगमध्ये 
संजय दत्त लहान असतानाचा हा किस्सा आहे. त्यावेळी सुनील दत्त यांना भेटण्यासाठी विविध निर्माते-दिग्दर्शक त्यांच्या घरी येत असायचे. हे सर्व लोक हॉलमध्ये बोलत असताना सिगारेट ओढायचे. ओढलेल्या सिगारेटची ते सर्व थोटके खिडकीतून बाहेर फेकायचे. बाहेर ही थोटके वऱ्हांड्यात पडलेली असायची. ती थोटके उचलून संजू ओढायचा. त्यावेळी पकडला गेल्यामुळे संजूला बोर्डिंगमध्ये पाठवण्यात आले. 


पुढच्या स्लाइडवर पाहा, कसा पकडला गेला संजू...


 

 

बातम्या आणखी आहेत...