आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या फोटोशूटच्या तयारीत बिझी आहे शाहरुखची लाडकी लेक, आई गौरीने केले उघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना बॉलिवूडच्या दिशेने पहिले पाऊल उचलत आहे. याचा खुलासा स्वतः सुहानाची आई गौरी खान हिने केला आहे. रविवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड सोहळ्यात पोहोचलेल्या गौरीला जेव्हा  सुहानाविषयी विचारणा झाली, तेव्हा गौरीने सांगितले, "सुहाना सध्या एका मॅगझिनच्या फोटोशूटच्या तयारीत बिझी आहे. पण हे मॅगझिन नेमके कुठले आहे, ते मी तुम्हाला आता सांगणार नाही." गौरीच्या या वक्तव्यावरुन सुहाना लवकरच मॅगझिनच्या कव्हरवर झळकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुहानाचे हे पहिलेच फोटोशूट असेल. 


सध्या शिकत आहे सुहाना... 
इव्हेंटमध्ये नेहमी स्टायलिश लूकने चर्चा एकवटणारी सुहाना मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. तिला डान्सिंग आणि स्पोर्ट्सची आवड आहे. ती शाळेच्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी होत असते. पण सुहानाने डान्सर बनून जगभरात नाव कमवावे, अशी शाहरुखची इच्छा असून अनेक मुलाखतींमध्ये त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, सुहाना खानचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...