आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनच्या क्लबमध्ये स्पॉट झाली शाहरुख खानची मुलगी, दिसली स्टायलिश लूकमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो लंडनच्या एका प्रायवेट क्लबचे आहेत. येथे सुहाना काही महिलांसोबत दिसतेय. सुहानाने ब्लॅक वन पीस, जॅकेट आणि बूट्स घातले आहेत. ती या लूकमध्ये ग्लॅमरस दिसतोय. आई गौरी खानने मुलगी सुहानाचे हे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटोज पोस्ट करत तिने लिहिलेय की,  'The British charm'.


- सुहानाच्या फॅन क्लबने तिचा अजून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती लंडनच्या रस्त्यांवर फ्रेंडसोबत फिरताना दिसतेय. यावेळी सुहाना मिनी स्कर्ट, नॉटेड शर्ट आणि टॉप घातलेली दिसतेय.
- अॅक्टिंगची आवड असलेली सुहाना लवकरच बॉलिवूमध्ये पहिले पाऊल ठेवणार आहे. याचा खुलासा तिची आई गौरी खानने काही दिवसांपुर्वी एका इव्हेंटमध्ये केला होता.
- गौरीला एका अवॉर्ड शोमध्ये सुहानाविषयी विचारण्यात आले होते तेव्हा गौरीने सांगितले की, "सुहाना सध्या मॅगझीनसाठीच्या फोटोशूटच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. परंतू तिने मॅगझीनचे नाव रिव्हिल केले नव्हते."
- हे सुहानाचे पहिले फोटोशूट असले. असे बोलले जातेय. की, सुहाना ज्या मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. ती मॅगझीन पुढच्या महिन्यात येणार आहे.

 

शाहरुखला वाटते मुलीने आपले नाव मोठे करावे
सुहानाने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. तिला डान्सिंग आणि स्पोर्ट्स खुप आवडते. ती शाळेतील अनेक स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी होते. शाहरुखला वाटते की, तिने डान्सर बनावे आणि जगभरात आपले नाव मोठे करावे. सुहाना सध्या लंडनमध्ये हायर एज्यूकेशन घेतेय. सुहाना सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह राहते. तिने फ्रेंड्ससोबत पार्टी करतानाचे अनेक फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुहानाचे ग्लॅमरस फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...