आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sunny Leone Make Precious Handmade Gift For Her Daughter Nisha Kaur Weber In 7 Month

सनी लियोनीने 7 महिने मेहनत करुन मुलीसाठी बनवले खास गिफ्ट, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सनी लियोनी आपल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक हँडमेट गिफ्टचा फोटो पोस्ट केला आहे. हे गिफ्ट तिने आपली मुलगी निशा कौर वेबरसाठी बनवले आहे. हे एक crystal beaded piece आहे. हे बनवण्यासाठी 7 महिने मेहनत करावी लागली. 


अनेक रात्र जागून सनीने तयार केले गिफ्ट
- सनी लियोनीने 7 महिन्यांपुर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. यामध्ये तिने लिहिले होते की, ती निशासाठी गिफ्ट तयार करतेय. 
- ती म्हणाली होती की, हे crystal beaded piece ती स्वतः बनवत आहे. "एक दिवस येईल तेव्हा मुलगी मला या गिफ्ट विषयी विचारेल. तेव्हा मी तिला सांगेल की, हे मी स्वतः तुझ्यासाठी बनवले आहे."
- अनेक दिवसांनंतर हे गिफ्ट तयार झाले आहे. या गिफ्टचा फोटो पोस्ट करत सनीने लिहिले की, "तुम्हाला आठवणीत आहे का, की मी 7 महिन्यांपुर्वी अक्टोबरमध्ये एक पोस्ट केली होती."
- "मी मुलीसाठी हा खास प्रोजेक्ट सुरु केला होता. अनेक हजार क्रिस्टलच्या मदतीने हे गिफ्ट तयार झाले. हे मी स्वतः माझ्या हाताने बनवले आहे."
- "फायनली मी रात्री 1 वाजेपर्यंत जागून हे कंप्लीट केले. हे पुर्ण झाले आहे आवर माझा विश्वास बसत नाहीये."
- "हे खुप मोठे काम होते. निशा या गिफ्टवरील प्रत्येक स्टोन मी तुझी आठवण काढत टाकले आहे, मग तुला कळेल की, मी तुझ्यावर किती प्रेम करते."


मुलीसोबत डेनियलची जबरदस्त बॉन्डिंग
- काही काळापुर्वी पापा डेनियल हे मुलगी निशासोबत जुहूमध्ये वॉक करताना स्पॉट झाले होते.
- यावेळी निशा बेबी सिटरमध्ये बसलेली दिसली होती. तर डेनियल तिला फिरवताना दिसला होता. क्लिक झालेल्या फोटोंमध्ये निशा खुप आनंदी दिसत होती. 
- सनी सध्या तामिळ चित्रपटात डेब्यू करतेय. तिचा पहिला तामिळ चित्रपट 'Veer mahadevi' चा फर्स्ट लूक समोर आला आहे.
- या पीरिअड ड्रामा चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसतेय. सनी वॉरिअर प्रिंसेस म्हणून दिसणार आहे. V C Vadivudayan च्या डायरेक्शनमध्ये हा चित्रपट तयार होतोय. चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे. 
- सनी आणि डेनियलने महाराष्ट्रातील लातूरमधून 21 महिन्यांच्या निशाला दत्तक घेतले होते. तर याच वर्षी मार्चमध्ये हे कपल सरोगेसीच्या माध्यामातून जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले.

11 पालकांनी निशाला दत्त घेण्यास दिला होता नकार
- सनी आणि डेनियलपुर्वी निशाला दत्त घेण्यास जवळपास 11 पालकांनी नकार दिला होता. कारण निशाचा रंग सावळा होता.
- मुलांना दत्तक देणा-या चाइल्ड अडाप्शन रिसोर्स एजन्सीचे सीईओ, लेफ्टिनेंट कर्नल दीपक कुमारने याचा खुलासा केला होता. "जास्तीत जास्त कुटूंब मुलांचा रंग, चेहरा आणि मुलांची मेडिकल हिस्ट्रीसाठी खुप उत्सुक असतात. याच कारणांमुळे मुलांना घेतले किंवा सोडून दिले जाते."
- "याच कारणामुळे निशाला 11 कुटूंबांनी दत्तक घेण्यास नाकारले होते. परंतू सनी आणि तिचा नवरा डेनियलला या गोष्टींमध्ये रस नव्हता. त्यांनी मुलीची बॅकग्राउंड, रंग, मेडिकल हिस्ट्री सारख्या गोष्टींची काळजी न करता तिला दत्तक घेतले."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सनी लियोनी आणि डेनियलचे मुलांसोबतचे काही फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...