आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हा' चित्रपट हिट झाला असता तर होऊ शकले नसते ट्विंकल आणि अक्षयचे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अक्षय कुमारची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. असे म्हटले जाते, की ट्विंकलचा मेला हा चित्रपट जेव्हा रिलीज होणार होता, त्याकाळात अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयकडे लग्नासाठी एक अट घातली होती. ती म्हणजे मेला हा चित्रपट फ्लॉप झाला, तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोघांचे लग्न झाले. जर मेला हा चित्रपट त्यावर्षी हिट ठरला असता, तर आज अक्षय-ट्विंकल पती पत्नी नसते. 

 

लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते दोघे...  
ट्विंकलने काही दिवसांपूर्वी एक शोमध्ये अक्षय आणि तिच्या लग्नाबाब एक मोठा आणि तितकाच धक्कादायक खुलासा केला होता. तिने सांगितल्यानुसार, तिची आई डिंपल कपाडिया अक्षयला गे समजत होत्या. डिंपल यांना त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने अक्षय गे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डिंपल यांनी अक्षयची माहिती काढली. इतकेच नाही तर अक्षयचे जेनेटिक चेकही केले. डिंपल यांनी अक्षय-ट्विंकलच्या लग्नाअगोदर त्यांना एक वर्ष लिव-इनमध्ये राहण्याची अट घातली होती. जर दोघांना त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नसेल तर लग्नाची परवानगी देण्यात येईल, असे ट्विंकल यांनी दोघांना सांगितले होते. अशाप्रकारे दोघे एक वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले आणि त्यानंतर लग्न केले. जानेवारी 2001 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. 2002 मध्ये त्यांचा मुलगा आरवचा जन्म झाला. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये त्यांची मुलगी निताराचा जन्म झाला.  


पुढे वाचा, * रोज रात्री रमी खेळतात ट्विंकल-अक्षय...
* अक्षयला आला होता सासूबाईंचा प्रचंड राग... 
* नितारापुर्वी ट्विंकलला अक्षयकडून हवे होते एक प्रॉमिस... आणखी बरंच काही 

बातम्या आणखी आहेत...