आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लेट्स टॉक लव्ह'मध्ये लागली कार्तिक-स्वराच्या नावाची वर्णी ? रोमँटिक कॉमेडी आहे चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजराती चित्रपटाची निर्माती कोठारी सिस्टर्स (नताशा आणि खुशी कोठारी) लवकरच एका बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाची कथा त्यांची आई आणि स्क्रिप्ट रायटर नंदिता कोठारी यांनी लिहिली आहे. रोमांटिक-कॉमेडी चित्रपटासाठी कार्तिक आर्यन आणि स्वरा भास्करला अप्रोच केले आहे. 


स्वरा भास्कर आणि कार्तिक आर्यन, दोघांसाठी हे वर्षे खूपच खास आहे. एकीकडे 'सोनू के टीटू की स्वीटी' नंतर कार्तिक आर्यनला वेगवेगळ्या चित्रपटाच्या ऑफर येत आहेत. दुसरीकडे 'वीरे दी वेडिंग' नंतर स्वरा भास्करकडेदेखील चांगल्या ऑफर्स येत आहेत. आता दोघांनाही 'लेट्स टॉक लव्ह' साठी अप्राेच करण्यात आले आहे.  


कार्तिकला याशिवाय दिनेश विजनच्या 'लुकाछिपी' मध्येदेखील घेण्यात आले आहे. यात त्याच्या अपोजिट कृती सेनन दिसेल. दुसरीकडे स्वराला 'वीरे दी वेडिंग' नंतर अनेक ऑफर्स मिळतील. सध्या ती एका चित्रपटाचे शूटिंग करण्यासाेबतच एक स्क्रिप्टदेखील वाचत आहे. 


या चित्रपटाविषयी नताशाने सांगितले, ही एक मॅच्युअर लव्ह स्टोरी आहे. लंडनची पार्श्वभूमी यात दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर जोडप्यांमध्ये प्रेम आणि विचारात बदल होतो. विशेष करून पत्नी पतीचे प्रत्येक म्हणणे ऐकायला कशी तयार होते, हे सर्व यात दाखवण्यात येईल. चित्रपटासाठी माझी पहिली पसंत स्वरा भास्कर आणि कार्तिक आर्यन आहे. दोघांची जोडी पडद्यावर युनिक दिसेल. दोघेही या चित्रपटासाठी होकार देतील अशी अपेक्षा आहे. या दोघांच्याशिवाय आम्ही नकारात्मक भूमिकेसाठीदेखील रणबीर कपूरचा कजिन ब्रदर अरमान जैन आणि सलमानचा मेहुणा आयुष शर्मालादेखील अप्रोच करण्यात आले आहे. दोघांपैकी कुणीही होकार दिला तर त्याला घेतले जाईल. सर्व काही सुरळीत झाले तर ऑक्टोबरच्या शेवटी या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू केले जाईल. तेथे 45 दिवसांचे शूटिंग करण्याचा विचार आहे. 

बातम्या आणखी आहेत...