आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या ऑनस्क्रिन बहिणीने सख्ख्या भावाच्या लग्नात धरला ताल, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात अभिनेता सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा सख्खा भाऊ ईशान भास्कर अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकला. भावाच्या लग्नात स्वराने झिंगाट डान्स केला. या लग्नाचे काही फोटोज समोर आले आहेत. स्वतः स्वरानेदेखील भावाच्या लग्नाचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोला तिने कॅप्शन दिले,  'At my #realveereydiwedding'. भावाच्या लग्नात स्वराने ग्रीन आणि पर्पल कलरचा लहेंगा परिधान केला होता. नवरदेव ईशानने लग्नात ब्लॅक आणि गोल्डन कलरची शेरवानी परिधान केली होती. ईशान त्याची गर्लफ्रेंड भूमिका जोशीसोबत 12 मार्च रोजी विवाहबद्ध झाला.

 

जेएनयूमध्ये प्रोफेसर आहे स्वराची आई...
स्वरा भास्करची आई जेएनयूमध्ये प्रोफेसर आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक फॅमिली फोटो शेअर करुन लिहिले, 'I’m really happy. My daughter is home, my son is married and I have got an amazing daughter-in-law. Swara has been the most excited throughout the wedding celebrations'. 


बातम्यांनुसार, स्वरा 'तनु वेड्स मनु रिटर्न' या चित्रपटाचे स्क्रिप्ट रायटर हिमांशू शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही. 


पुढील स्लाईड्सवर बघा, स्वराच्या भावाच्या लग्नाचे फोटोज...