आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swara Bhaskar Will Not Smoke Onscreen Worst Experience While Shooting Veere Di Wedding

'वीरे दी वेडिंग'ची अॅक्ट्रेस म्हणाली - आता स्क्रिनवर कधीच करणार नाही स्मोकिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री स्मोकिंग करताना दिसतात. पण अलीकडेच एका अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले, की चित्रपटात स्मोकिंग केल्यानंतर तिची प्रकृती बिघडली होती. आता यापुढे कधीच चित्रपटांमध्ये स्मोकिंग न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले आहे. ही अभिनेत्री आहे स्वरा भास्कर. आगामी वीरे दी वेडिंग या चित्रपटाक स्वरा स्मोकिंग करताना दिसणार आहे. या चित्रपटातील 'लाज शरम...' सोमवारी रिलीज झाले.


'वीरे दी वेडिंग'मध्ये चेन स्मोकर आहे स्वरा...
- 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात स्वरा भास्करने अशा तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे जी चेन स्मोकर असते.
- ख-या आयुष्यात कधीच सिगारेटला स्पर्श केला नसल्याचे स्वराने मुलाखतीत सांगितले.
- स्वरा म्हणाली, 'अनारकली ऑफ आरा' या चित्रपटात दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन मी बिडी ओढली होती. त्याचा अनुभव अतिशय वाईट होती. बिडी पिल्याने माझी तब्येत खराब झाली होती.


भूमिकेत जीव ओतण्यासाठी करावी लागली होती स्मोकिंगची प्रॅक्टिस...
- स्वरा भास्करने सांगितले, की 'अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील एका दृश्यात मी स्मोक तर केले, पण त्यानंतर माझी प्रकृती बिघडली. त्यानंतर आता 'वीरे दी वेडिंग'मध्येही हेच काम करावे लागले, तेव्हा खूप अडचण आली. 
- स्वरा पुढे म्हणाली,  'दिग्दर्शक शशांक घोषने मी योग्यरित्या स्मोक करत नसल्याचे सांगितले. त्यामुळे भूमिकेत जीव ओतण्यासाठी मला स्मोकिंगची प्रॅक्टिस करावी लागली होती.'
- स्वराने सांगितले, 'जेव्हा मी योग्यरित्या स्मोक करायला लागले, तेव्हा दिग्दर्शकाने मला शॉटसाठी ओके दिले. मी या वाईट वस्तूला खासगी आयुष्यात कधीच स्पर्श केला नाही.'
- करीना, सोनम आणि शिखा तलसानियासोबत शूटिंग करताना खूप मजा आली. शूटिंग संपल्यानंतर सगळ्याच जणी उदास झाल्यासे, स्वराने सांगितले. 
- 'वीरे दी वेडिंग'या चित्रपटातील स्मोकिंगच्या अनुभवानंतर आता आगामी चित्रपटांमध्ये कधीही स्मोक न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्वराने सांगितले. 
- सध्या स्वराला स्लिप डिस्क (कबंरदुखी) चा त्रास सहन करत असून डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र तरीदेखील ती चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. येत्या 1 जून रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. 


पुढील स्लाईड्सवर बघा, 'वीरे दी वेडिंग'च्या सीन्सचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...