आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हीरोला ओळखलंत का तुम्ही? तब्बूच्या घटस्फोटित बहिणीने याच्यासोबत थाटला दुसरा संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमीत सहगल आणि फराह नाज - Divya Marathi
सुमीत सहगल आणि फराह नाज

आपल्या अभिनयाने 80 आणि 90 चा दशक गाजवणारी अभिनेत्री आणि तब्बूची थोरली बहीण फराह नाज हिने नुकताच 49 वा वाढदिवस साजरा केला. 9 डिसेंबर 1968 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या फराहने अनेक सुपरस्टार्ससह काम केले आहे. त्यामध्ये राजेश खन्नासह ऋषी कपूर, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मिथुन, गोविंदा, सनी देओन आणि आमिर खानसारख्या दिग्गज आणि प्रसिध्द अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे. फाराहने 20 वर्षांच्या फिल्मी करिअरदरम्यान 60पेक्षा जास्त सिनेमे केले. त्यातील अनेक सिनेमे सुपरस्टार ठरलीत. परंतु बॉलिवूडची ही यशस्वी अभिनेत्री 2005नंतर अचानक या लाइमलाइटच्या जगातून गायब झाली.

 

1985मध्ये 'फासले' सिनेमातून करिअरची सुरुवात करणा-या फराहचे लग्न विंदू दारासिंगसोबत झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. विंदू दारासिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर फराहने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत अभिनेता सुमीत सहगलसोबत दुसरा संसार थाटला. सुमीतसुद्धा एक अभिनेता आहे. विशेष म्हणजे फराहचेच नव्हे तर सुमीतचेसुद्धा हे दुसरे लग्न आहे. काही निवडक चित्रपट केल्यानंतर तो अज्ञातवासात निघून गेला. पहिल्या लग्नापासून फराह एक मुलगा तर सुमीतला एक मुलगी आहे. सुमीतच्या मुलीचेसुद्धा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले आहे.   


कुणासोबत झाले होते सुमीतचे पहिले लग्न, कोण आहे त्याची मुलगी, तो आता कुठे आणि काय करतोय, हे जाणून घेऊयात या खास पॅकेजमधून... 

बातम्या आणखी आहेत...