आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Grandmother शर्मिला टागोर म्हणाल्या- माझ्यापेक्षा तैमूर अधिक प्रसिद्ध, मीडियाने त्याला स्टार बनवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमूर अली खानची गणना लोकप्रिय स्टार किडमध्ये होते. मीडिया असो किंवा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी तैमूर प्रसिद्ध आहे. तैमूरची लोकप्रियता बघून त्याची आजी शर्मिला टागोर म्हणाल्या, माझ्यापेक्षा माझा नातू तैमूर जास्त फेमस आहे. कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात शर्मिला यांनी हे वक्तव्य केले. कोलकातामध्ये पश्चिम बंगाल सरकार आणि कोलकाता पोलिसांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा जागरुकता कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. 


- शर्मिला पुढे म्हणाल्या, मीडिया आतापासूनच तैमूरला एका स्टारप्रमाणे वागणूक देत आहेत. अलीकडेच तो प्री स्कूलमध्ये जायला लागला आहे.

- दीड वर्षांचा तैमूर जिथे जाईल तिथे कॅमे-याच्या नजरा त्याच्याकडे वळत असतात. वयाच्या अवघ्या दीड वर्षांतच तैमूर कॅमे-यासमोर पोज द्यायला शिकला आहे. आई करीनाने एका मुलाखतीत म्हटले होते, की तैमूर कॅमेरा बघून पोज द्यायला कसा शिकला, हे मला न उलगडलेले कोडे आहे.
- एका अवॉर्ड फंक्शनमध्ये तैमूरसाठी कुठल्या क्षेत्राची निवड करशील, असा प्रश्न करीनाला विचारला गेला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली होती, की त्याला हवे ते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला असणार आहे. पण त्याने क्रिकेटर व्हावे अशी माझी इच्छा आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...