आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच मम्मी-पप्पासोबत शाळेत पोहोचला तैमूर, केले खास फोटोशूट, बघा Class Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर आता प्ले स्कूलमध्ये जातोय. तो फक्त आता 18 महिन्यांचा असून नेहमी त्याच्या नॅनीसोबत प्ले स्कूलमध्ये जाताना दिसत असतो. यावेळी मात्र करीना आणि सैफसोबत तैमूर त्याच्या शाळेत पोहोचला. तैमूरच्या क्लासचा एक फोटो समोर आला असून यामध्ये चिमुकली मुलं त्यांच्या पॅरेंट्स आणि क्लासमेट्ससोबत पोज देताना दिसत आहेत. तैमूर रेड चेक शर्टमध्ये आई करीनाच्या कडेवर दिसतोय. तर पप्पा सैफ त्यांच्या शेजारी दिसत आहे. 


- तैमूरच्या शाळेने हा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत कॅप्शन लिहिले, "Proud & happy parents of our Early Explorer's class of 2018 - the first step in a lifelong journey of exploration, creativity & learning।"
- तैमूरच्या ज्या शाळेत शिकतोय त्याची तीन महिन्यांची फीस ही 15 हजार रुपये आहे. म्हणजेच एका महिन्याची फीस ही पाच हजार रुपये आहे. विशेष म्हणजे  या चिमुकल्या मुलांचा वर्ग आठवड्यातून एकदा भरतो.
- शाळेत मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी अत्याधुनिक इक्यूप्मेंट्स आहेत. दर आठवड्याला मुलांकडून बॅलेंसिंग, हँगिंग, साँग्स, पपेट शो, स्पेशल राइड्स. सायकल रायडिंग, वॉकिंग अप स्टेअर्स यांसारख्या विविध अॅक्टिव्हिटीज करुन घेतल्या जातात.  


तैमूरवरुन अनेकदा ट्रोल झाली आहे करीना...
- काही दिवसांपूर्वीच लंडनला फॅमिली ट्रीपवर गेलेल्या करीना आणि तैमूरचे काही फोटोज व्हायरल झाले होते. यापैकी एका फोटोत तैमूर स्कूटर चालवताना दिसतोय, तर दुस-या फोटोत त्याचा बॅलेन्स बिघडलेला दिसला. त्यावेळी करीना आरामात कॅमे-याला पोज दिसताना दिसली होती.
- हा फोटो समोर आल्यानंतर करीनावर सोशल मीडिया यूजर्सकडून टीका व्हायला सुरुवात झाली होती.
- यापूर्वीही करीना तैमूरवरुन अनेक ट्रोल झाली आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या मत,े करीना कधीच त्याला कडेवर घेऊन दिसत नाही. यावर उत्तर देताना करीना म्हणाली होती की, तैमूरवर माझे किती प्रेम आहे, हे मला जगाला दाखवण्याची गरज नाही.  

 

बातम्या आणखी आहेत...