आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः शीला रे... मॉडेल, स्ट्रगलिंग अॅक्ट्रेस आणि सोशलाइट होत्या. त्यांची दुसरी ओळख सत्ते पे सत्ता, बादशाह यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते सुधीर यांच्या पत्नीच्या रुपात होती. शिवाय बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळेही त्या चर्चेत होत्या. शीला रे यांच्यासोबत 1977 साली एक अशी घटना घडली, ज्यामुळे त्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा अशोक बनकर जे आज 53 वर्षांचे आहेत, ते त्यावेळी केवळ 12 वर्षांचे होते. एका सकाळी अशोक यांनी जेव्हा घराचे दार उघडले, तेव्हा घराबाहेर आईला अतिशय वाईट परिस्थितीत बघितले. शीला रे यांच्यावर गँगरेप झाला होता.
निर्भयासारखा झाला होता अत्याचार, रात्रभर चार लोकांनी केला होता अत्याचार...
- शीला यांच्यावर चार जणांनी गँगरेप केला होता आणि सकाळी त्यांना बेशुद्धावस्थेत त्यांच्या घराबाहेर फेकून देण्यात आले होते.
- शीला रे यांचा मुलगा अशोक यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की "आई बिल्डिंगबाहेर बेशुद्धावस्थेत आढळली होती. वॉचमन तिला घरात घेऊन आला. तिची अवस्था बघून मी घाबरलो आणि तिला बिलगून रडू लागलो."
- शीला यांनी या घटनेची तक्रार पोलिसांत कधीच केली नाही. 1990 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
- शीला आणि त्यांचे पती सुधीर यांचा अशोक एकुलता एक मुलगा आहे. सुधीर यांनी 'सत्ते पे सत्ता' (1982) या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा भाऊ शोमची भूमिका साकारली होती.
शीला यांच्यासोबत त्या रात्री काय घडले होते...
- अशोक यांनी एका मुलाखतीत त्या रात्री शीला यांच्यासोबत घडलेली घटना विस्ताराने सांगितली होती. ते म्हणाले होते, त्या रात्री आईसोबत नेमके काय घडले, हे जाणून घ्यायला मला अनेक वर्षे लागली.
- अशोक म्हणाले, "माझ्या आईला मुंबईतील पॉश परिसरातील उषा किरण या इमारतीत सेक्शुअली असॉल्ट आणि अब्यूज केले गेले होते. त्या बिल्डिंगमध्ये बॉलिवूड स्टार्स आणि बिझनेस टायकूनसोबत अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत लोक राहात होते."
- "बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये एका व्यक्तीने आईला ड्रगचा डोज दिला आणि अन्य तिघांनी त्याला साथ दिली. यापैकी एक फोटोग्राफर होता, ज्याने गँगरेपचे फोटो काढले होते."
पुढे वाचा, फोटोग्राफर करायला ब्लॅकमेल...
नोटः आमच्या 'बॉलिवूड क्राइम' या नवीन सीरिजअंतर्गत आम्ही एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अशा घटना समोर आणणार आहोत, ज्या पडद्यामागील दुःख आणि वेदना सांगतात. पहिल्या भागात जाणून घ्या बॉलिवूडच्या निर्भयाविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.