आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले या 13 कलाकारांचे शेवटचे दिवस, अशी झाली होती अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता आमिर खानच्या लगान या गाजलेल्या चित्रपटात ईश्वर काकाची भूमिका साकारणारे अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. रविवारी त्यांनी जयपूर येथे अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली होती. ते केवळ लिक्विड डाएटवर होते. 2013 मध्ये त्यांचे कुटुंब जैसलमेरहून जोधपूर येथे स्थायिक झाले होते. श्रीवल्लभ व्यास यांची पत्नी शोभा यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या आजारपणामुळे दोन वर्षांत त्यांना तीनदा घर बदलावे लागले होते. श्रीवल्लभ व्यास यांच्या आजारपणामुळे त्यांना घर मिळत नव्हते. 

 

केवळ श्रीवल्लभ व्यासच नव्हे तर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा अखेरचा काळ अतिशय हलाखीच्या अवस्थेत गेला. यामध्ये अभिनेत्री परवीन बाबीपासून ते शोलेचे रहीम चाचा म्हणजेच ए.के हंगल यांच्या नावाचा समावेश आहे. हे कलाकार आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटे राहिले आणि अज्ञातवासात आयुष्य घालवले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनेकांकडे तर शेवटच्या काळात उदर्निवाह आणि उपचारांसाठी पैसेसुद्धा नव्हते.

 

परवीन बाबी
परवीन बाबीची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये होते. पण सुपरस्टार असूनदेखील शेवटच्या काळात ती एकटी होती. महेश भट, कबीर बेदी, डॅनी यांच्यासोबतचे तिचे प्रेमकिस्से बरेच गाजले होते. मात्र प्रेमात नेहमीच तिच्या पदरी अपयश पडले. 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथोनी' आणि 'शान'सारख्या सुपरहिट सिनेमांत काम करणा-या परवीन बाबीचा मृत्यू मुंबईमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये झाला होता. 22 जानेवारी 2005ला तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये मिळाला होता. तिच्या शेजा-यांनी पोलिसांना सूचना दिली, की ती मागील तीन दिवसांपासून वर्तमानपत्र आणि दूध घेत नाहीये. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. परवीन मुंबईमध्ये दिर्घकाळ एकटी राहिली. ती डिप्रेशनची शिकार झाली होती आणि तिने स्वत: जगापासून दूर ठेवले होते. ती कुणालाच भेटत नव्हती, सिनेमांतून अचानक गायब होऊन अज्ञातवासात गेली होती.


पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच स्टार्सविषयी ज्यांनी शेवटचा काळ अतिशय वाईट परिस्थितीत घालवला...

बातम्या आणखी आहेत...