आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सिनेमांमध्ये व्हिलनची भूमिका साकारणा-या अभिनेत्यांना आपण ओळखतो. खासगी आयुष्यात सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतानासुद्धा हे सेलिब्रिटी दिसत असतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांच्या पत्नींचे फोटोज दाखवत आहोत. यापैकी अनेक जणांच्या पत्नी कॅमेरा आणि लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.
शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर
अभिनेते शक्ती कपूर यांनी अनेक सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांचे लग्न अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची बहीण शिवांगी कोल्हापुरेसोबत झाले आहे. 1982 साली शक्ती आणि शिवांगी लग्नगाठीत अडकले. शिवांगी लाइमलाइटपासून दूर राहतात. केवळ फॅमिली फंक्शनमध्ये त्या सहभागी होताना दिसतात. पद्मिनी कोल्हापुरेची ती थोरली बहीण आहे. शक्ती आणि शिवांगी यांना सिद्धांत कपूर आणि श्रद्धा कपूर ही दोन मुलं आहेत. हे दोघेही अॅक्टर आहेत. श्रद्धाची गणना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये होते. तर सिद्धांत मात्र अद्याप फिल्म इंडस्ट्रीत फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. शक्ती कपूर यांनी 'खेल किस्मत का' (1977), 'संग्राम' (1979), 'जानी दुश्मन' (1979), 'नसीब' (1981), 'रॉकी' (1981), 'कुर्बानी' (1980) सह अनेक सिनेमांत अभिनय केला आहे.
रंजीत आणि आलोका बेदी
रंजीत यांनी अनेक सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी 1986 साली आलोका बेदीसोबत लग्न केले. चंकी पांडे यांच्या मातोश्री स्नेहलता पांडे यांनी रंजीत आणि आलोका यांची भेट घालून दिली होती. या दाम्पत्याला दिव्यंका बेदी आणि चिरंजीव ही दोन मुले आहेत. आलोका यांना लाइमलाइटमध्ये राहणे पसंत नाही. रंजीत यांनी 'गैर कानूनी' (1989), 'हमसे ना टकराना' (1990), 'पाप का अंत' (1989), 'जान की कसम' (1991), 'आ गले लग जा' (1994), 'करन अर्जुन' (1995) सह अनेक सिनेमांत अभिनय केला आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या आणखी काही प्रसिद्ध खलनायकांच्या पत्नींविषयी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.