आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • These Bollywood Stars Also Will Get Married In 2018 मिथुनच्या मुलापासून ते \'वीरे दि वेडिंग\'च्या अॅक्टरपर्यंत, 2018 मध्ये हे सेलेब्स थाटू शकतात लग्न

मिथुनच्या मुलापासून ते \'वीरे दि वेडिंग\'च्या अॅक्टरपर्यंत, 2018 मध्ये हे सेलेब्स थाटू शकतात लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2018 हे वर्ष अर्धे सरले आहे. याकाळात अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स लग्नगाठीत अडकले. यामध्ये सोनम कपूर, नेहा धूपिया, मिलिंद सोमण आणि हिमेश रेशमिया या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. 'छोटी बहू' फेम रूबीना दिलाइक 21 जून रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अभिनव शुल्कासोबत शिमल्यात लग्नाच्या बेडीत अडकली.  रूबीना आणि अनुभवशिवाय यावर्षी आणखी काही टीव्ही आणि बॉलिवूड सेलेब्स लग्न करण्याची शक्यता आहे. 

 

मिमोह चक्रवर्ती आणि मदालसा शर्मा

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह आणि मदालसा यांचे लग्न 7 जुलै रोजी ऊटीच्या 'द मोनार्क' या हॉटेलमध्ये होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. याचवर्षी मार्च महिन्यात मिमोहच्या मढ आयलँडच्या घरी त्यांचा साखरपुडा झाला होता. मिमोहने  2008 मध्ये 'जिम्मी' या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर तो 'द मर्डरर', 'हांटेड', 'लूट', 'रॉकी', या चित्रपटांमध्ये झळकला. मदालसा चित्रपट निर्माते सुभाष शर्मा यांची लेक आहे. 2009 मध्ये तेलुगु फिल्म 'फिटिंग'द्वारे तिने अॅक्टिंग डेब्यू केला होता. शौर्य या कन्नड चित्रपटात ती झळकली आहे. 


सुमीत व्यास आणि एकता कौल
'वीरे दी वेडिंग' फेम सुमीत व्यास आणि 'मेरे अंगने में' या टीव्ही शोमध्ये झळकलेली अभिनेत्री एकता कौल की यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात लग्न थाटणार आहेत. सुमीत आणि एकता यांची भेट एखा शोच्या प्रोमो शूटदरम्यान झाली होती. गेल्या वर्षभरापासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. एकता मुळची जम्मूची आहे. त्यामुळे दोघांचे लग्न मुंबईऐवजी जम्मू येथे होणार आहे. काश्मिरी पद्धतीने त्यांचे लग्न होणार आहे. 

 

आणखी कोणते सेलिब्रिटी यावर्षी लग्न थाटणार आहेत, टाकुयात त्यावर एक नजर पुढील स्लाईड्सवर...

 

बातम्या आणखी आहेत...