आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या डॉक्टरने रणबीरला बनवले संजय दत्त, चालण्या-बोलण्याची दिली ट्रेनिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चा टीजल रिलीज झालाय. चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याने संजय दत्तचा डेब्यू चित्रपट 'रॉकी' पासून तर 'मुन्नाभाई एमबीबीएस' पर्यंत विविध भूमिका हुबेहूब साकारल्या आहेत. एवढेच नाही तर त्याने संजय दत्तची स्टाइल आणि बोलण्याची पध्दती हुबेहूब कॉपी केली आहे. परंतू रणबीरला संजय दत्त बनवण्यामागे कुणाचा हात आहे तुम्हाला माहिती आहे का?


चालण्यापासून बोलण्यापर्यंत, संकेतने अशी दिली रणबीरला ट्रेनिंग...
- प्रसिध्द स्टँडअप कॉमेडिअन आणि मिमिक्री आर्टिस्ट संकेत भोसलेने रणबीर कपूरला संजय दत्त बनण्यात मदत केली. संकेत पेश्याने डर्मेटोलॉजिस्ट आहे. त्याने रणबीरला संजय दत्तची मिमिक्री शिकवली. यासोबतच चालण्याची, उभे राहण्याची आणि बोलण्याची स्टाइल त्याला शिकवली. 


- 29 वर्षांच्या संकेतने काही महिन्यांपुर्वी मुलाखतीत सांगितले होते की, - मी पहिल्यांदा रणबीरला भेटलो तेव्हा त्याला मी डॉक्टर आहे हे एकूण आश्चर्य वाटले. आम्ही दोघं 3 तास हॉटेलमध्ये होतो आणि या काळात फक्त संजय दत्तवर चर्चा झाली. याच काळात रणबीरने माझे काही व्हिडिओही पाहिले. यामध्ये मी संजय दत्तची मिमिक्री केली होती. यानंतर रणबीरने विचारले की, तु इतक्या सहज कॉपी कसा करतो. 


- संकेत सांगतो की, संजू बाबाविषयीच्या अनेक गोष्टी रणबीरला माझ्याकडून जाणून घ्यायच्या होत्या. त्यांची चालण्याची आणि बोलण्याची डिफरंट स्टाइल त्यांना माझ्याकडून शिकायची होती. यानंतर मी रणबीरला संजू सरांची डोळे फिरवण्याची स्टाइल सांगितली, यामुळे ते खुप इम्प्रेस झाले. यानंतर रणबीरने माझे काही व्हिडिओही पाहिले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, दिवालीला फटाके नाही, कैदीचे कपडे खरेदी करायचा संकेत...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...