आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर झाला खुलासा! रणबीर कपूरने आलिया भट्टला कुठे आणि कसे केले प्रपोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र होऊ लागल्या आहेत. नुकतेच जीक्यू या मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने त्याच्या आणि आलियाच्या रिलेशनची गोष्ट कबुल केली आहे. आलिया आणि रणबीर सध्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात सोबत काम करत आहेत.

 

नुकताच खुलासा झाला आहे की रणबीरने आलियाला कुठे आणि कसे प्रपोज केले तर सहा महिन्यांपूर्वी शूटिंगवेळी रणबीर आणि आलियाचे सूत जुळले. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, न्यू ईअरवेळी रणबीरने आलियाला सर्वप्रथम बाहेर सोबत जाण्यासाठी विचारले होते.तेव्हा दोघे बुल्गारियामध्ये 'ब्रह्मास्त्र'ची शूटिंग करत होते. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरने त्याच्या काही खास मित्रांना त्याच्या या रिलेशनविषयी सांगितले जेव्हा तो शूटिंगहून परतला तेव्हा त्यांच्या या नात्याची बाहेर चर्चा झाली. 'ये जवानी है दीवानी' चित्रपटात रणबीरने दीपिका पादुकोणला न्यू ईअर ईव्हला प्रपोज केले होते आता हा सीन रणबीरने खऱ्या आयुष्यातही सत्यात उतरवला आहे.

 

आलिया आणि रणबीरचे हे नाते त्याच्या घरच्यांनीही मान्य केले आहे. आलिया नुकतीच रणबीरसोबत फॅमिली डिनर करताना दिसली तर काही दिवसांपूर्वीच आलियाला रणबीरची बहीण रिद्धीमाने महागडे ब्रेसलेट गिफ्ट केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रणबीर-आलियाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...