आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणला 'पापा मेरे पापा' म्हणणारी ही चिमुरडी आठवतेय? आता दिसतेय इतकी ग्लॅमरस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आज फादर्स डे. संपूर्ण जगभरात वडिलांसाठीचे प्रेम व्यक्त करण्यासाठीचा हा खास दिवस. वडिलांना खूश करण्यासाठी अनेकजण त्यांच्यासाठी खास गाणे डेडीकेट करत आहेत. असेच एक गाणे आहे पापा मेरे पापा. 'मै ऐसा ही हू' या चित्रपटातील अजय देवगणचे हे खास गाणे आपल्याला नक्कीच आठवत असेल. यातील एक छोटी चिमुरडी अजय देवगणसाठी म्हणजेच चित्रपटातील तिच्या वडिलांसाठी हे गाणे म्हणताना आपल्याला दिसते. ही गोंडस मुलगी आता कशी दिसते आणि काय करते याची माहिती आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

तर अजय देवगणच्या या ऑनस्क्रिन मुलीचे नाव आहे ऋचा वैद्य. ऋचाने 2005 साली 'मै ऐसा ही हू' या चित्रपटात सर्वप्रथम काम केले होते. त्यानंतर तिने 'जोधा अकबर' आणि 'रिता' या दोन चित्रपटात 2009 साली काम केले. त्यानंतर ऋचा आपल्याला चित्रपटात दिसली नाही. पण ऋचा सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आणि तिचे अनेक फोटो शेअर करत असते. ऋचाने शेअर केलेल्या पोस्टवरुन तिने नुकतेच काही जाहिरातीत काम केले आहे. लहानपणीची ऋचा आणि आताची ऋचा पाहिली तर आपल्याला ओळखू येणार नाही इतकी ती सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. आम्ही तिचे इन्सटाग्रामवरील काही फोटोज् खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा ऋचा वैद्यचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...