आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चित्रपटाला मिळाले होते पहिल्यांदा A सर्टिफिकेट, सेक्स सीन नव्हे हे होते कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक विशाल पंड्यांचा 'हेट स्टोरी 4'  हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. 'ए' सर्टिफिकेटसोबत हा चित्रपट रिलीज करण्यात आाला आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांना 'ए' सर्टिफिकेट मिळाले आहे. पण बॉलिवूडच्या इतिहासात 'ए' सर्टिफिकेट मिळालेला पहिला चित्रपट कोणता? हे तुम्हाला ठाऊक आहे का? जर नाही, तर मग या पॅकेजमधून जाणून घ्या 'ए' सर्टिफिकेट मिळालेला पहिला बॉलिवूड चित्रपट कोणता होता.


या कारणासाठी मिळाले होते ए सर्टिफिकेट...
रिपोर्ट्सनुसार 1950 मध्ये रिलीज झालेल्या 'हंसते आंसू' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे पहिले  'ए' सर्टिफिकेट मिळाले होते. ए सर्टिफिकेट मिळवणारा हा बॉलिवूडच्या इतिहासातील पहिला चित्रपट होता. चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट मिळण्याचे कारण सेक्स सीन्स किंवा बोल्ड कंटेंट नव्हे तर चित्रपटाचे शीर्षक यासाठी कारणीभूत ठरले होते. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला होता. अश्रू हसरे कसे असू शकतात, असा प्रश्न सेन्सॉरने उपस्थित केला होता. दिग्दर्शक केबी लाल यांच्या या चित्रपटात मोतीलाल आणि मधुबाला मेन लीडमध्ये झळकले होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सेन्सॉरशी निगडीत आणखी काही खास गोष्टी आणि सोबतच सेक्स सीन्समुळे कोणत्या चित्रपटाला मिळाले होते पहिले ए सर्टिफिकेट...

बातम्या आणखी आहेत...