आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत चित्रपट पाहायला गेला टायगर, फोटोग्राफर्सपाहून लपवला चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टायगर श्रॉफ बुधवारी रात्री बहीण कृष्णा आणि गर्लफ्रेंड दिशा पाटनीसोबत चित्रपट पाहायला पोहोचला. चित्रपट पाहिल्यानंतर तिघंही बाहेर पडताना दिसले. यावेळी फोटो ग्राफर्सने त्यांचा फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याची बहीण कृष्णाने चेहरा लपवून घेतला. तर टायगरनेही सीटच्या मागे आपला चेहरा लपवला. कारमध्ये दिशा फ्रंट सीटवर बसलेली होती, तर टायगर आणि कृष्णा बॅक सीटवर बसलेले होते.


मीडियापासून बचाव करत होता टायगर
- टायगर आणि दिशाच्या अफेअरच्या चर्चा मीडियामध्ये सुरु असतात. परंतू दोघांनी हे अधिकृतरित्या जाहिर केलेले नाही. तर टायगर सध्या आपल्या नात्याविषयी मीडियासमोर बचाव करताना दिसतात. चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर तो चेहरा लपवताना दिसला. तर बुधवारी दिशाचा वाढदिवसही होता. परंतू टायगरने सोशल मीडियावर विश देखील केले नाही. फक्त त्याची बहीण कृष्णाने तिला शुभेच्छा दिल्या. टायगर आणि दिशाने 'बागी 2' चित्रपटात एकत्र काम केले आहे.


दिशाचा मेंटरही बनला आहे टायगर
- टायगर फक्त दिशाचा बॉयफ्रेंड राहिला नाही. तर तिचा मेंटरही आहे. 'बागी 2' च्या यशानंतर दिशाला सलमान खानच्या 'भारत' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. टायगरने तिला सल्ला दिला आहे की, तिने आपली अॅक्टिंग स्किल पॉलिश करावी आणि जास्तीत जास्त ऑडिशन द्यावे. रिपोर्टनुसार दिशा 'भारत' चित्रपटात सलमानच्या बहीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'भारत'सोबतच दिशा साउथ इंडियन चित्रपट 'संघमित्र'मध्ये काम करत आहे.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...